एक्स्प्लोर
coronavirus | मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ सुरू, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
दोन दिवसांत 12 कोटी 50 लाख रुपये या खात्यात जमा झाले असून अनेक नामवंत संस्थांकडून मिळाली आहेत दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसांत 12 कोटी 50 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्व दानशूर व्यक्तींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.
सीएसआर निधीतून तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक संस्थांनी मदत केली आहे. इंडियन ह्यूम पाईप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फ़ार्म इझी, महानगर गॅस, सिप्ला फॉउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एम्एसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया या संस्थानी मास्कस, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स , आरटी- पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर अशी सुमारे 10 कोटी रुपयांची विविध उपकरणे आणि साहित्य दिले आहे.
Solapur Young Kid Song | सोलापूरमधील चिमुकलीकडून पोलिस आणि डॉक्टरांसाठी गोड गाणं! कोरोनाच्या काळजीच्याही सूचना
राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे.
मदत करण्यासाठी खात्याची सविस्तर माहिती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
संबंधित बातम्या :
देशासमोर मोठं आर्थिक संकट, आपल्याला भरपूर काटकसर करावी लागणार : शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement