Mumbai Rain : मुंबईत सलग चौथ्या दिवशी पावसाची कोसळधार, रेड अलर्ट जारी; विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, कोकणातील महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
बंगल्याच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहेत. हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव मंगळवारी देखील जाणवणार आहे. मंगळवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Weather Alert : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना काल (18 ऑगस्ट) मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. हवामान विभागाने आज देखील मुंबई, मुंबई उपनगरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर पठारी भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई विद्यापीठाच्या आजच्या (19 ऑगस्ट 2025) परीक्षा या पुढे ढकलल्या आहेत. सोबतच सुधारीत वेळापत्रकानुसार 23 ऑगस्ट रोजी या परीक्षा होणार आहे.
दुसरीकडे, कोंकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील सर्व वरिष्ठ अनुदानित आणि विना अनुदानित महाविद्यालयांना आज (19 ऑगस्ट 2025 रोजी) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत आज देखील कोसळधार
बंगल्याच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत आहेत. हे क्षेत्र मुंबईजवळ असल्याने त्याचा प्रभाव मंगळवारी देखील जाणवणार आहे. मंगळवारी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बुधवारी गुजरातकडे सरकल्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असं हवामान खात्याच म्हणणं आहे. मुंबईत रात्रभर पाऊस कोसळत असून आज दिवसभर अशीच परिस्थिती असणार आहे. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा, अस अहवान पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबईतील परळच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून कामावर जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई आणि लगतच्या भागात कोसळत असलेल्या दमदार पावसाचा इशारा लक्षात घेता विद्यार्थीहित व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आजच्या ( 19 ऑगस्ट) सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर सुधारीत वेळापत्रकानुसार आता या परीक्षा 23 ऑगस्ट 2025 रोजी नियोजित वेळेनुसार होणार आहेत. आज आयोजित असलेल्या परीक्षांमध्ये मास्टर ऑफ आर्ट कम्युनिकेशन जर्नेलिझम सत्र 3, पीआर सत्र 3, टेलेव्हिजन स्टडीज सत्र 3, इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्र 3, फिल्म स्टडीज सत्र 3, एमपीएड सत्र 2, बीपीएड सत्र 2, बीफार्म सत्र 1, एमफार्म सत्र 2, एमएड सत्र 2, एमकॉम (ईकॉमर्स) सत्र 4, एमए (सीडीओई), बीई ( कम्प्युटर सायन्स अँड डिजाईन, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) यासह अन्य परीक्षांचा समावेश आहे. या परीक्षांना बसणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
कोंकण विभागातील सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
दरम्यान, कोंकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील सर्व वरिष्ठ अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांना आज (19 ऑगस्ट 2025 रोजी) सुट्टी जाहीर. केली आहे. असे परिपत्रक संचालक, उच्चशिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जाहीर केले आहे.
ही बातमी वाचा:
























