Leo Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : 6 ऑक्टोबरपर्यंत पैशाने भरलेला राहणार खिसा; नोकरी-व्यवसायात लाभच लाभ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Leo Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...
Leo Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आता होत आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा सिंह राशीसाठी नेमका कसा असणार? सिंह राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा सिंह राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)
प्रेम जीवनात किरकोळ वाद निर्माण होऊ शकतात. काही नाती टिकू शकणार नाहीत. नातेसंबंधातील वाद संपवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जे लोक लॉग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना नातं मजबूत करण्यासाठी जोडीदारासोबत जास्त वेळ घालवावा लागेल. प्रवास करताना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना शेअर करू शकता, तुम्ही लग्नाबद्दलही चर्चा करू शकता. विवाहित लोकांनी ऑफिस रोमान्सपासून दूर राहावं.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
या आठवडयात तुम्हाला एखाद्या आव्हानात्मक प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते, यामुळे प्रगतीच्या अनेक संधीही उपलब्ध होतील. आठवड्याच्या शेवटी करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. ऑफिसच्या कामात अहंकाराचा प्रश्न येऊ देऊ नका. हा आठवडा जाहिरात, कॉपीरायटिंग किंवा डिझायनिंग क्षेत्रात असणाऱ्यांसाठी अनेक संधी घेऊन येईल. उद्योजकांना या आठवड्यात नवीन व्यावसायिक डील मिळू शकतात.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाची आवक वाढेल. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता. परदेशात सुट्टीवर जाण्यासाठी तुम्ही हॉटेल आरक्षण आणि फ्लाईट बुकिंग करू शकता. व्यापाऱ्यांना या आठवड्यात नफा होईल.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांचं आरोग्य सामान्य राहील. आठवड्याची सुरुवात शस्त्रक्रियेसाठी चांगली राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. जंक फूड टाळा. तुमच्या आहारात फळं, भाज्या आणि ड्रायफ्रूट्सचा जास्त वापर करा. खेळाडूंना अधिक सावध राहावं लागेल. किरकोळ दुखापत होऊ शकते. दिवसाची सुरुवात जिम किंवा योगा क्लासने करा, यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: