Cancer Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : कर्क राशीसाठी पुढचे 7 दिवस वरदानाप्रमाणे; कमावणार बक्कळ पैसा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Cancer Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...
Cancer Weekly Horoscope 30 September To 06 October 2024 : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात आता होत आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा कर्क राशीसाठी नेमका कसा असणार? कर्क राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा कर्क राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)
नवीन आठवड्यात लव्ह लाईफमध्ये जास्त अडचणी येणार नाहीत. घरचे प्रियकराला स्वीकारतील. काही लोकांना त्यांच्या नात्याकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. ज्या लोकांचं नातं तुटण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचलं आहे, त्यांच्या नात्यात आज नवीन सकारात्मक बदल दिसून येतील. आपण जोडीदारासोबत सुट्टीचं नियोजन करू शकता. काही भाग्यवान मुलींचं लग्न या आठवडयात प्रियकराशी निश्चित होऊ शकतं.
कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तुम्हाला तुमच्या नोकरीच्या संदर्भात परदेशात जावं लागेल, या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळेल. व्यावसायिकांना किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे.
कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)
आर्थिक बाबतीत फार अडचणी येणार नाहीत. तथापि, पैशाची आवक देखील तेवढी चांगली राहणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. आंधळेपणाने गुंतवणूक करणं टाळा. या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक गरजांसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही सामाजिक कार्यासाठी NGO ला पैसे देऊ शकता.
कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)
या आठवड्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. काही लोकांना किडनी किंवा छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांची शस्त्रक्रिया नियोजित आहे, त्यांनी न डगमगता त्याला सामोरं जावं. खेळताना मुलांना दुखापत होऊ शकते, परंतु कोणतीही गंभीर समस्या उद्भवणार नाही. तुम्हाला गोड खावसं वाटेल, पण ते टाळणं आरोग्यासाठी चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :