Laxman Hake : तुम्ही मागास झालात ना, तर 11 विवाह आपआपसात ठरवूयात; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगे पाटील यांना भर सभेत प्रस्ताव, म्हणाले....
Laxman Hake on Manoj Jarange Patil: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यासमोर ओबीसी समाजातील (OBC) तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव मांडला आहे.

Beed News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यासमोर ओबीसी समाजातील (OBC) तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव मांडला आहे. तुम्ही मागास झालात ना? तर आता जरांगेंना माझं सांगणं आहे. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. तर आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो. आता पहिले 11 विवाह आप आपल्यामध्ये ठरवूयात, तुम्ही आमच्यात आले आहात. आता जात पात राहिली का? पाटील, 96 कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले का? त्यामुळे 11 विवाह जाहीर करू. असे थेट आवाहन करत लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा जाहीर सभेतून प्रस्ताव दिला आहे.
11 विवाहासाठी आमच्याकडे 11 मुलं असल्याचे देखील हाके यांनी बीडच्या गेवराई येथील शिंगारवाडी येथे आयोजित ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या जाहीर सभेत म्हटले आहे.
जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागलेत- लक्ष्मण हाके
लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही 96 कुळी, मराठा, क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी मागासवर्गीय. हे मी बोललो नाही बरं का, ते हे स्वर्गीय एनडी पाटील बोलायचे. जात चोरांनो तुम्हाला मागासपणाचे डोहाळे लागले असल्याचे म्हणत हाके यांनी जरांगे पाटलांना लक्ष केले.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे काल (12 सप्टेंबर) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गेवराईतील शृंगारवाडी येथे काल ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना हाकेंनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिल्याचे दिसून आले. अजित दादा मी गाजत वाजत बारामतीच्या पोलीस स्टेशनला येणार आहे. यावेळी त्यांनी मराठा आंदोलन मनोज जलांगे यांचा देखील समाचार घेतला. तुम्ही आता आमच्यात आले ना तर अकरा विवाह तुमच्या आमच्यात करून त्याआधी जाहीर करा, हाके यांनी असे बोलत थेट जरांगेंना डिवचल्याचे दिसून आले. पुढे बोलताना हाकेंनी आज बीड जिल्ह्यातील मराठा लोकप्रतिनिधींवर निशाणा साधल्याचे दिसून आले. गेवराईचा आमदार जातीवादी आहे. असे म्हणत त्यांनी चंदनचोर सोनवणे तुझं शिक्षण किती? असे म्हणत खासदारावरही टीका केली. तुमच्यात लय दम असला तर फक्त पदाचा राजीनामा देण्याचे आव्हान त्यांनी आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि खासदार बजरंग सोनवणे यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Laxman Hake & Manoj Jarange: ज्यांच्यापासून संरक्षण हवं तेच लांडगे ओबीसींच्या कळपात शिरले तर... लक्ष्मण हाकेंचा मराठा राज्यकर्त्यांवर हल्लाबोल























