एक्स्प्लोर

Laxman Hake : सत्ताधारी अन् विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागलीय, त्यांना आम्ही धडा शिकवणारच; लक्ष्मण हाकेंचा इशारा

Laxman Hake: ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली त्यांना आम्ही धडा शिकवणार. असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

Laxman Hake हिंगोली : सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटीअरचा शासन निर्णय हा ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संपवणारा जीआर आहे. मुख्यमंत्री यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी हा जिआर रद्द करावा. अन्यथा ओबीसी आरक्षण संपण्याची भीती आहे. तर आज हिंगोलीत कुणबी प्रमाणपत्र दिले, त्याच जिल्ह्यात आम्ही ते रद्द करावं म्हणून आंदोलन करत आहोत. ज्या सत्ताधारी आणि विरोधकांना मराठा समाजाच्या (Maratha Reservation) मतांची काळजी लागली त्यांना आम्ही धडा शिकवणार. असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला आहे. शिवाय डीएनए ओबीसी म्हणून चालणार नाही, तर मुख्यमंत्र्यांनी कर्तुत्वातून तो दाखवायला पाहिजे असेही हाके म्हणाले.

हिंगोलीच्या (Hingoli) कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आज हैदराबाद गॅजीटीअर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधवांच्या वतीने एल्गार मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी औंढा नागनाथाचे दर्शन घेतले असून त्यांनी यावेळी माध्यमांशी बातचीत केलीय. त्यावेळी ते बोलत होते.

आपलं झोपडं या कारखानदारांनी उध्वस्त केलं, ते वाचवण्यासाठी एकत्र येऊया - लक्ष्मण हाके

हैद्राबाद गॅझेटनुसार जर मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं, तर तांडा वस्तीवर राहणाऱ्या बंजारा समाजाला ही असं वाटू शकतं. बंजारा समाजाला विनंती आहे, आपल्या ताटातल आरक्षण वाचवनं हे गरजेचे आहे. आपलं झोपडं आधी वाचवू, आपल्यात फूट पडेल, असं कुठल्याच समाजाने वागू नये. असे म्हणत हाके यांनी बंजारा समाजाला आवाहन केलं आहे. आज रोजी आपली झोपडी उध्वस्त झाली आहे. त्या झोपडीला वाचवण्यासाठी आपण एकत्र येऊया. महाराष्ट्रातील साडेचारशे जातींना विनंती आहे कि, आपलं झोपडं या कारखानदारांनी उध्वस्त केलं आहे. ते वाचवण्यासाठी एकत्र येऊया असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षानें एका चौथी नापास व्यक्तीला आंदोलनाचं नेतृत्व दिलं

विरोधी पक्षानें एका चौथी नापास व्यक्तीला या आंदोलनाचं नेतृत्व दिलं. त्यांना रस पुरवली, त्यांनी बेकायदा मागणी केली आणि त्यांच्या म्हण्यावर सरकार हा बेकायदा जीआर काढला. त्यामुळे आम्हा ओबीसीचा कोणीही नाही. विरोधी पक्ष नाही आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा नाही. असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेता टीका केली आहे.

जरांगे पाटलांच आंदोलन विरोधी पक्षांनी उभं केलं. जर त्यांनी आंदोलन उभं केलं नसत, तर आमचं आरक्षण गेलं नसतं. शरद पवारांनी जर आंदोलन उभं केलं नसतं, तर ही बेकायदा मागणी आहे असं सांगितलं असतं. माझी राजकीय कारकीर्द एवढ्या वर्षाची आहे, हे मागासांच आरक्षण आहे. हे जर शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांच्या कानात सांगितलं असतं. तर ही वेळ आमच्यावर आली नसती असेही लक्ष्मण हाके म्हणाले.

तुम्ही नेहमी शरद पवारांवर टीका करता, जीआर तर फडणवीसांनी काढलाय ना? असा प्रश्न केला असता जीआर फाडून टाकलाय ना आम्ही, त्यांचं काय कौतुक करतोय का आम्ही, शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर आहे. फडणवीस म्हणतायत ओबीसीचा डीइनए आहे. पण नुसतं म्हणून चालणार नाही, तर ते कतृत्वाने दाखवावं लागेल असेही ते म्हणाले.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Embed widget