Waqf Board and Latur Farmer : लातूरमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, वक्फ बोर्डाबाबत सरकारमधील मंत्र्यांचा मोठा खुलासा
Waqf Board and Latur Farmer : लातूरमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळलाय.
Waqf Board and Latur Farmer : वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) मिळकती राज्यात कुठे आहेत याचा तपशीलवार नोदी आहेत..त्यात तळेगाव आणि बुधोडा येथील शेत जमिनीचा समावेश नाही, असे स्पष्ट करण्यासाठी वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या दोन्ही गावात बैठकी घेतल्या आहेत.. यामुळे शेतकऱ्यांना (Latur Farmer) मोठा दिलासा मिळाला आहे.
तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना आली होती नोटीस
लातूर जिल्ह्यातील तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची (Waqf Board) नोटीस आली होती.. त्यांच्या शेतजमिनीवर दावा करण्यात आला होता मात्र त्यात आता या शेतकऱ्यांना (Latur Farmer) दिलासा देणारी घडामोड झाली आहे... राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील ..औसा चे आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी या गावात जात शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे...
लातूर जिल्ह्यातील दोन गाव तळेगाव आणि बुधोडा यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील शंभर शेतकऱ्यांच्या 197 एकर जमिनीवर वक्फ ट्रिब्युन्युअल कडून नोटीस आली होती.. जमिनीवर दावा करण्यात आला होता.. या गावातील सर्व शेतकरी हवालदिलं झाले होते... त्याचप्रमाणे औसा तालुक्यातील बुधोडा येथील 25 शेतकऱ्यांना नोटीस आली होती... 125 एकर पेक्षा अधिकच जमिनीवर दावा करण्यात आला होता...
वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी आणि सहकार मंत्र्यांची एकत्र बैठक
या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती... त्याच दरम्यान वक्फ बोर्डाचे राज्य अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केलं होतं की या जमिनीवर बोर्डाने दावा केला नाही... बोर्डाच्या जमिनी कुठे आहेत याची नोंद त्यांच्याकडे आहे.. त्यात या जमिनीचा उल्लेख नाही.. यातील फिर्यादी हे वैयक्तिक पद्धतीने फिर्याद करत आहेत.. कोर्टात याबाबत निर्णय होईलच... मात्र बोर्डाचा या दहाव्याशी संबंध नाही...असे स्पष्ट केल्यानंतरही या दोन्ही गावातील शेतकरी त्रस्त होते...त्यांना दिलासा मिळावा यासाठी वक्फ बोर्डचे अध्यक्ष समीर काझी... सहकार मंत्री बाबासाहेब पाटील.. औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी एकत्र येत या गावात बैठक घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे ...
इतर महत्त्वाच्या बातम्या