एक्स्प्लोर

Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप

Beed Crime : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापतच चाललंय. अशातच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आलाय.

Beed Crime बीड : बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापतच चाललंय. अशातच देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हे सर्व प्रकरण समोर आणले आहे. एकट्या बीड जिल्ह्यात एक हजाराहून अधिक परवानाधारक पिस्टल आहेत.

बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेनंतर बीडचा बिहार होतोय का? असं देखील सर्व स्तरातून बोलले जातंय. देशमुख यांच्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड यांचा हवेत गोळीबार करताना व्हिडिओ ट्विट केला. आणि शस्त्र परवाना बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीड जिल्ह्यात 1 हजार 281 पिस्तूल परवाने, तर 295 अर्ज फेटाळले  

बीड जिल्ह्यात एक हजार 281 पिस्तूल परवाने आहेत. तर 295 जणांचे अर्ज फिटाळण्यात आले आहे. जिल्हाभरातून आलेल्या अर्जातून एकट्या परळी तालुक्यात 55 अर्ज फेटाळले गेलेत. दरम्यान पिस्तूल परवान्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज लागत नसून त्यासाठी अनेक नियमावली असल्याचं बीडमधील पिस्तूल परवानाधारक पत्रकार भागवत तावरे यांनी सांगितले आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांचा संताप, म्हणाले...

सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून देखील या प्रकरणाची चौकशी करून सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली जातेय. आज बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बीड जिल्ह्यात किती गंभीर आहे. याबाबत भाष्य केले. तर यातील मास्टरमाइंडचा शोध घेतला नाही तर मात्र 28 तारखेच्या मोर्चानंतर स्वतः बजरंग सोनवणे उपोषणाला बसणार आहेत. 

परळी मधील कैलास फड आणि त्याचा मुलगा निखिल कैलास फोड याने त्याच्या मुलांसमोर त्याच्याकडे असलेल्या परवानाधाराक रिवॉल्वरमधून  हवेत गोळ्या झाडल्या. हाच तो कैलास फड जाणे मतदानादिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माधव जाधव याला सुद्धा सगळ्यांसमोर मारहाण केली होती. प्रश्न केवळ हातात रिवॉल्वर असण्याचा नाही, तर कायद्याचा धाक न उरल्यामुळेच बीडमध्ये ही गुंडागर्दी वाढली असल्याचे बोलले जात आहे. 

बीडचा बिहार झाला आहे का? 

मागच्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना त्या इतक्या वाढल्यात की बीड जिल्ह्यात कायद्याचा धाक आहे किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या परिस्थितीला केवळ एक जण दोषी आहे असेही म्हणता येणार नाही. ज्यावेळी एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी या व्यवस्थेतील प्रत्येक घटक त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये जबाबदार असतो. त्यामुळे बीडचा बिहार झाला आहे का नाही याची चर्चा करण्यापेक्षा बीडची ही परिस्थिती सुधारण्यासाठी कोणी पुढे येणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.  

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget