एक्स्प्लोर

"जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा मलीन केलीय..."; लातुरात नीट प्रकरणी जिल्हापरिषदेच्या मुख्याध्यापकाचं निलंबन

Latur News: नीट घोटाळा प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या जिल्हापरिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित. गुन्हा दाखल झाल्यावर जलीलखाँ पठाणचं निलंबन

Latur NEET Exam Paper Leak Case: लातूर : नीट परीक्षा (NEET Paper Leak Case) मार्कवाढ प्रकरणात लातूर (Latur) जिल्ह्यातील कातपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) मुख्याध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद शाळेची प्रतिमा मलीन केल्याचं निलंबन आदेशात म्हटलं आहे. 

नीट (NEET Exams) पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक जलीलखाँ पठाण याचं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केलं आहे. जलीलखाँ पठाण हा लातूर जिल्ह्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक होता. जलीलखाँ पठाण आणि संजय जाधव हे दोघं लातुरातून नटी पेपरफुटीचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, जलीलखाँ पठाण विरोधात नांदेड एटीएसच्या पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही केली आहे. 

निलंबन आदेशात काय म्हटलंय? 

आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांची सेवेविषयी बेपर्वाई आणि अनास्था दिसून आली आहे, असं जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  निलंबन आदेशात म्हटलं आहे. 

लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव आणि कातपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक जलीलखाँ उमरखान पठाण हे दोघेजण पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती नांदेड एटीएसला मिळाली. त्यानंतर एटीएस पथक शनिवारी लातूरमध्ये दाखल झालं आणि संबंधित दोघांची पडताळणी आणि चौकशी केली. त्यांच्यासह इतरांवर रविवारी रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी दोघांनाही अटक करण्यात आली. 

लातूर पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण? 

लातूरमध्ये उघडकीस आलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Exam Paper Leak Case) आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जलीलखाँ पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरन्ना कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे. 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Adam Gilchrist: कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
Raj Thackeray MNS Meeting: न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ,  हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ, हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुने बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुने बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 2 PM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 OCT 2025 : ABP Majha
Banjara Protest :  बंजारा समाजाचं उपोषण अखेर मागे, मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ भेटीला
BMC Polls: 'वन फिफ्टी प्लस'चं टार्गेट, मुंबई पालिकेसाठी भाजपचा नवा जागावाटप फॉर्म्युला
Doctors Protest: 'कारवाई न झाल्यास आंदोलन', Phaltan महिला डॉक्टर प्रकरणी निवासी डॉक्टरांचा इशारा
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, दिवाळी सुट्टीचा शेवटचा वीकेंड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Adam Gilchrist: कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
Raj Thackeray MNS Meeting: न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ,  हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
मध्यरात्री बाईकला धडक देऊन प्रसिद्ध अभिनेत्रीने काढला पळ, हिट-अँड-रन प्रकार चर्चेत, नेमकं घडलं काय?
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुने बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
पुण्यात ससूनमध्ये थेट रक्ताचे नमुने बदलले, आता फलटणला रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; तेव्हा सत्तेतील आमदार अडचणीत, आता खासदारांवर कथित आरोप
Sanjay Shirsat: मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
मी 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, आता कधीतरी...; मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत?
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचित पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर, गृहखात अजगरासारखं निपचित पडलंय, संजय राऊतांना सडकून प्रहार
Weather Update: सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
Shreyas Iyer Injury : मागे पळत सूर मारुन झेल पकडला, पण श्रेयस अय्यर जोरात आपटला, रडत रडत सोडलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा Video
मागे पळत सूर मारुन झेल पकडला, पण श्रेयस अय्यर जोरात आपटला, रडत रडत सोडलं मैदान, नेमकं काय घडलं? पाहा Video
Embed widget