एक्स्प्लोर

Latur News : आता कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही; लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Latur  News : या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कॉफी शॉपवर कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार आहे.

Latur  News : लातूर जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील कॉफी शॉपसाठी (Coffee Shop) नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ज्यात यापुढे आता कोणत्याही कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही. सोबतच प्रत्येक कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही असणे देखील बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे कॉफी शॉपसाठी आता नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. तर या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कॉफी शॉपवर कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार आहे. प्रशासनाचा या निर्णयाचे लातूरकरांनी स्वागत केलं आहे. 

गेल्या काही दिवसांत लातूर शहरात कॉफी शॉपचे प्रमाण वाढले आहेत. तर या कॉफी शॉप वेगवेगळ्या थीमवर आधारित आहेत. मंद प्रकाश, अंधाऱ्या जागेतील गाण्याची सुरावट, तरुण-तरुणींना बसण्यासाठी निर्माण केलेले कंपार्टमेंट पाहायला मिळतात. कॉफी शॉपमध्ये कॉफी सोडून सगळं काही होतं अशी चर्चा पाहायला मिळते. तर अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी प्रेमात पडल्यावर या कॉफी शॉपचा आसरा घेतात. याच कॉफी शॉपमध्ये मित्र मैत्रिणीचे वाढदिवसही साजरी केले जातात आणि संगीताच्या तालावर बेधुंद होऊन तरुण नाचतात. दरम्यान अशा कॉफी शॉपच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. 

नवीन नियमावली तयार करण्यात आली... 

राज्यात लातूर शहराला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या इथे मोठ्याप्रमाणात आहे. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. तालुक्याच्या भागातून शहरात येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या सुद्धा मोठी आहे. मात्र अशात प्रेमी जोडप्यांना कुठेतरी आसरा घ्यावा म्हणून कॉफी सेंटरचा पर्याय असतो. त्यामुळे कोठेतरी यावर निर्बंध यायला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. पण याबाबत कायद्यात काही तरतुदी नसल्याकारणाने पोलिसांना थेट कारवाई करता येत नव्हती. यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे ही संपूर्ण बाब लक्षात घेत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आता नवीन नियमावली बनवल्या आहेत. तसेच या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येण्याचा धोरण राबवण्यात येणार असल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

काय आहे नियमावली...

  • कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही
  • स्वतंत्र कंपार्टमेंट करता येणार नाहीत 
  • धूम्रपणास बंदी राहिल.
  • कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असतील
  • सर्वांचे चेहरे नीट दिसतील अशी प्रकाश योजना आणि बैठक व्यवस्था असणे आवश्यक आहे.

'एबीपी माझा'ची पाहणी....

दरम्यान 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांनी शहरातील अशाच काही कॉपी शॉपमध्ये जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कॉपी शॉपमध्ये सर्वत्र अंधार पाहायला मिळाला. आतमध्ये बसलेल्या लोकांचा चेहराही दिसणार नाही इतका मंद प्रकाश होता. अनेक ठिकाणी अल्पवयीन तरुण-तरुणी गळ्यात गळे घालून बसले होते. तर अशा कॉपी सेंटरमध्ये एका तासासाठी दीडशे रुपये ते पाचशे रुपये मोजावे लागतात. विशेष म्हणजे कॉफीसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Latur News : दोन गटातील हाणामारीनंतर 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले; शाळा प्रशासनाची बाजू आली समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget