एक्स्प्लोर

Maharashtra News: शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट गडद; पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात, मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक

Maharashtra News: लातूर जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाअभावी कोवळी पिके कोमेजून जात आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती आहे, तर बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

लातूर: लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील काही भागात मृगाच्या प्रारंभी थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. या पावसाच्या भरवश्यावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. मात्र, त्यानंतर अद्याप पाऊस झालेला नाही. सध्या तर उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस नसल्याने अनेक भागात पिके कोमेजून जात आहेत तर काही भागात कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 101.8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी या कालावधीत झालेल्या पावसाच्या तुलनेत 188 मिमी पावसाची तूट आहे. मराठवाड्यात लातूर जिल्ह्यासारखी पावसाची स्थिती धाराशिव, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही आहे. मराठवाड्यातील इतर चार जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस झाल्या असल्याने येथील स्थिती काही प्रमाणात बरी आहे.

दुबार पेरणीचे संकट गडद

सध्या सोयाबीनच्या पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. पुढील आठ दिवसात पाऊस झाला नाही तर लातूर जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्टरवरील सोयाबीनचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच पर्यायाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची भीती आहे. एका एकर सोयाबीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार रुपये खर्च करावा लागतो. दुबार पेरणी करायची झाल्यास तेवढाच खर्च पुन्हा करण्याची वेळ शेतकऱ्यावर येणार आहे.

लातूर जिल्ह्यात मागील 28  दिवसापासून पावसाचा खंड आहे. पाच लाख 91 हजार हेक्टर पैकी पाच लाख 61 हजार क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मुख्य पिक हे सोयाबीन चे क्षेत्र चार लाख 45 हजार 896 आहे. यात सरासरी पेक्षा जास्त पेरणी झाली आहे. 28 दिवसापासून पावसाचा खंड आहे पिकांनी माना टाकल्या आहेत. ढगाळ वातावरण मुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा फटका पिकांना बसत आहे. सोयाबीन लागवडी नंतर 25 ते 35 दिवसापर्यंत फुल धारणा होत असते..मात्र नेमके याच अवस्थेत पावसाने खंड दिल्याने त्याचा थेट परिणाम पिकाचा उत्पादनावर होणार आहे. या 28 दिवसात काही ठिकाणी पाऊस पडला आहे मात्र तो बरसून काहीच उपयोग झाला नाही.

बीडमध्ये मध्यरात्री महिनाभराच्या विश्रांतीनंतर दमदार पावसाची हजेरी

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बीडसह परिसरातील तालुक्यात मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली असून जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या पावसानंतर अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

जून महिन्यात केवळ 59 टक्केच पाऊस झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे. जून महिना सुरू झाल्यापासून पावसाची गती एकदमच मंदावली होती. 30 दिवसांच्या कालावधीत सरासरी 11 दिवस पाऊस झाला, तर 19 दिवस पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातसुद्धा समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून ते 14 जुलै या कालावधीत एकूण 80.09 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलीय. म्हणजेच जुलैमध्ये केवळ 30 मिलिमीटर पाऊस झाल्याचे या आकडेवारी वरून दिसून येत आहे.परंतु मध्यरात्री जवळपास दोन तास पावसाने दमदार हजेरी लावली जो पाऊस पिकांना दिलासा देणारा म्हणावा लागेल. जिल्ह्यातील पाणी प्रकल्प भरण्यासाठी जोरदार पाऊस अपेक्षित आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Latur: बैल गेला अन् संसार अडला! पेरणीसाठी अर्धांगिनीने खांद्यावर घेतले जू; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने शेतकऱ्याला मिळालं 'बैलजोड'
बैल गेला अन् संसार अडला! पेरणीसाठी अर्धांगिनीने खांद्यावर घेतले जू; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने शेतकऱ्याला मिळालं 'बैलजोड'
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
वीज कोसळून बैल मेला, माय जुंपली नांगराला; शेतकरी दाम्पत्याचा पोटात कालवणारा व्हिडिओ व्हायरल, सर्वत्र हळहळ
Latur News: नातू-पणतू विरुद्धच्या दाव्यात 90 वर्षीय आजीचा विजय! बक्षीसपत्र, फेरफार रद्द अन् जमीनही वापस मिळवली, लातूरच्या खटल्याची राज्यभरात चर्चा
नातू-पणतू विरुद्धच्या दाव्यात 90 वर्षीय आजीचा विजय! बक्षीसपत्र, फेरफार रद्द अन् जमीनही वापस मिळवली, लातूरच्या खटल्याची राज्यभरात चर्चा
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
Embed widget