एक्स्प्लोर

Latur : आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा

Latur Teacher Aakrosh Morcha : राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा होती. आक्रोशो मोर्चासाठी शिक्षक एकवटले. 

लातूर : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. राज्यभरातल्या 27 शिक्षक संघटनातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आज राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे नियोजन केले होते. यात राज्यभरातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सामूहिक रजा टाकून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून गेले होते. लातूर येथे मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी गर्दी केली होती.

विद्यार्थी व शिक्षक यांच्यावरील संच मान्यता बाबतचा 15 मार्च 2024 आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द होणे, आम्हाला शिकवू द्या या प्रमुख मागण्यांसह इतर 22 मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत कायमच सरकारी स्तरावर उदासीन भूमिका आहे. सरकार कोणाची असो शिक्षकांबाबत निर्णय घेताना वेळ काढूपणा केला जातो. वेळोवेळी विविध आंदोलने मोर्चे निवेदने विनंती अर्ज करण्यात आले आहेत. मात्र सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. यामुळे सरकार दरबारी शिक्षकांचा आवाज पोहोचला पाहिजे, प्रश्नाची उकल झाली पाहिजे या उद्देशाने राज्यातील 27 विविध संघटनांनी एकत्र राज्यभरातील शिक्षकांचे आक्रोश मोर्चाचे नियोजन केलं होते.

काय आहेत मागण्या?

  • शिक्षकांना फक्त शिकऊ द्या.
  • 15 मार्च 2024 चा संच मान्यता चा शासन निर्णय रद्द करावा.
  • वीस किंवा वीस पेक्षा कमी पट संख्येच्या शाळेच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्त देण्याचा पाच सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा.
  • विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थी आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारण धोरण रद्द करा.
  • शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी.
  • जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय राहण्याची अट रद्द करा.
  • 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  • विद्यार्थ्यांना मोफत गणवेश विना विलंब वाटप करण्यात यावे.
  • अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा.
  • पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवून यात यावी.

यासह एकूण 22 मागण्या शिक्षकांनी मांडल्या आहेत. आज हजारो शिक्षकांनी किरकोळ रजा घेऊन पालकासह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढले होते. मागण्या बाबत सरकार गंभीर नसेल तर शिक्षक संघटनेने आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याची माहिती दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sameer Bhujbal : मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या 0
मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
Brazil Aircraft Crash : विमान इमारतीच्या चिमणीला धडकून दुसऱ्या मजल्यावर फर्निचरच्या दुकानावर कोसळले; 10 जणांचा अंत, 15 गंभीर जखमी
विमान इमारतीच्या चिमणीला धडकून दुसऱ्या मजल्यावर फर्निचरच्या दुकानावर कोसळले; 10 जणांचा अंत, 15 गंभीर जखमी
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Wagholi Accident : पुण्यात अपघात कसा घडला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारSanjay Raut Full PC : बीडचं पालकमंत्रिपद कुणालाही दिलं तरी देशमुखांना न्याय मिळणार का?Pooja Khedkar : पूजा खेडकरांनी सुनावणी दरम्यान दाखल केलेली याचिका मागेTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM :23 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sameer Bhujbal : मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या 0
मात्र, चर्चा सांगण्यासारखी नाही! नाराजीची चर्चा असतानाच समीर भुजबळांच्या थेट उत्तराने भूवया उंचावल्या
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ओबीसींनी यंदा...
Brazil Aircraft Crash : विमान इमारतीच्या चिमणीला धडकून दुसऱ्या मजल्यावर फर्निचरच्या दुकानावर कोसळले; 10 जणांचा अंत, 15 गंभीर जखमी
विमान इमारतीच्या चिमणीला धडकून दुसऱ्या मजल्यावर फर्निचरच्या दुकानावर कोसळले; 10 जणांचा अंत, 15 गंभीर जखमी
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
राहुल गांधी परभणीत जातीय विद्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतायत? आशिष देशमुखांचा सवाल, म्हणाले 'देशाची माफी मागा..'
Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा वाळू माफियांना इशारा, विदर्भातील तस्करांवर महसूल विभागाचा वॅाच, अधिकाऱ्यांवरही टांगती तलवार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम हवं असतं, कारण....; संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका
गडचिरोलीचे पालकमंत्री पद काही लोकांना कायम हवं असतं, कारण....; संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
परभणीत सोमनाथ सुर्यवंशी प्रकरण तापणार; राहुल गांधी सांत्वनासाठी जाणार, शिवसेना, भाजपचे मंत्रीही आज पोहचणार!
Embed widget