मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाताना अपघात, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Latur News : मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे.
Latur Road Accident News : मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार पलटी झाली, त्यामुळे हा अपघात झाला.
निलंगा ते औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार पटली झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भिषण होता की कार पलटी होऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली आहे. अपघातातील लोक हे चाकूर येथील रहिवासी आहेत. मुलीच्या सोयरीकीच्या कामांसाठी औरादकडे जात होते अशी प्राथमिक माहीती समोर आली आहे. जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे ..तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी हे कुटुंब निघाले होते, त्याच वेळी काळाने घाला घातला.
शॉर्ट सर्किटमुळे आग, लातुरात सात ट्रॅव्हल्स जागेवरच जळून खाक
लातुरात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत तब्बत सात ट्रॅव्हल्स जागेवरच जळून खाक झाल्या. मध्यरात्री लागलेल्या या आगीमध्ये तब्बल दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लातूर शहरातील रिंग रोडवर आगीची ही घटना घडली. लातूर शहरातील रिंग रोड भागात डेटिंग आणि पेंटिंग करणाऱ्या एका दुकानातील सात ट्रॅव्हल्स अक्षरश जळून खाक झाल्या आहेत. या ठिकाणी या सात ट्रॅव्हल्स काम सुरू होतं. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर या ठिकाणी असलेल्या हाय टेन्शन तार तुटल्याने शॉर्ट सर्किट झालं. त्यातून खाली उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला आग लागली. पाहता पाहता या ठिकाणी उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या आहेत.