Latur News : तीन दिवसांपासून लातूरमधील बस सेवा ठप्प,एक कोटीपेक्षा अधिक आर्थिक नुकसानाचा एसटीला फटका
Latur News : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे लातूरमधील बस सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प आहे. यामुळे एसटीला 50 लाख रुपयांचा फटका बसला आहे.
![Latur News : तीन दिवसांपासून लातूरमधील बस सेवा ठप्प,एक कोटीपेक्षा अधिक आर्थिक नुकसानाचा एसटीला फटका Latur Maharashtra Bus service is stopped from last three days because of Maratha Reservation Protest detail marathi news Latur News : तीन दिवसांपासून लातूरमधील बस सेवा ठप्प,एक कोटीपेक्षा अधिक आर्थिक नुकसानाचा एसटीला फटका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/31/d4b33e37430c0a6cc73ff8c4d864b5541698765242640720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळतयं. पण कोणत्याही आंदोलनामध्ये पहिला दगड पडतो तो बसवर. यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार राज्य परिवहन महामार्ग लातूर (Latur) यांच्या सर्व बस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवार दुपारसपासून या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. लातूर विभागात पाच बस आगार आहेत. यामध्ये एकूण 564 बसच्या फेऱ्या होत असतात. पण सध्या बस सेवा ठप्प असल्यामुळे या सर्व बसेस आगारात उभ्या आहेत.
लातूरच्या बस आगारातून दररोज किमान 2750 बसच्या फेऱ्या होत असतात. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दररोज 50 लाख रुपयांची उलाढाल होत असते. पण मागील अडीच दिवसापासून लातूरमधील बस सेवा ही ठप्प झालीये. यामुळे जवळपास दररोज 50 लाख रुपयांचे एसटीचे नुकसान झाले. तसेच अडीच दिवसांत एक कोटी पेक्षा अधिक नुकसानाचा फटका एसटीला महामंडाळाला सहन करावा लागत असल्याची माहिती सध्या समोर आलीये.
नागरिकांचे प्रचंड हाल
ग्रामीण भागामध्ये वाहतूकीसाठी एसटी हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून एसटीने शहरात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थी, आरोग्य सेवेसाठी येणारे लोक, मोठे व्यापारी यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसेच बसेस बंद असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बसेस आगारात सुरक्षित
बीड जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी एसटी महामंडळाच्या बसेसवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे लातूर मधील सर्व बसेस या आगारात सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती, आरागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बसचे नुकसान होऊ नये या दृष्टीकोनातून लातूर आगाराच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)