एक्स्प्लोर

Latur : लातूरमध्ये एकाच दिवशी दोन भागातील डीपी जळाले, 30 गावं दोन दिवसांपासून अंधारात, वीजेचा काही पत्ताच नाही

Latur Electricity : अहमदपूर आणि नळगीर येथील डीपी जळाल्याने तीस गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात आहेत. 

लातूर : मागील काही दिवसापासून उन्हाचा कडाका तीव्र वाढला आहे, त्यामुळे विद्युत वापरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दुपारी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात विद्युत वापर वाढला आहे. अतिरिक्त लोड आल्याने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि नळगीर येथील डीपीला (Electric Transformer) आग लागल्याची घटना घडली आहे. अहमदपूर येथील डीपी रविवारी दुपारी चार ते पाच या वेळेत जळाला. तर नळगीर येथील डीपी संध्याकाळी सात वाजता जळाला. एकाच दिवशी दोन भागातील डीपी जळाल्याने (Latur Electricity) जवळपास 30 गावे ही रविवारी संध्याकाळपासून अंधारात आहेत.

अहमदपूर महावितरणच्या पॉवर ट्रान्सफार्मरला आग 

अहमदपूर येथील महावितरण उपविभागातील शहरासह ग्रामीण भागास विद्युत पुरवठा करणारा एक पॉवर ट्रान्सफार्मरला रविवारी संध्याकाळच्या सुमारास भिषण आग लागली होती. यात विद्युत ट्रान्सफार्मर जळून खाक झाले आहे, त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत महावितरण उपविभाग अहमदपूर शहरातील कार्यालयाच्या परिसरातील अर्ध्या शहराला विद्युत पुरवठा करणारा पॉवर ट्रान्सफार्मरला रविवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती. अहमदपूर शहरासह तालुक्यातील काही ग्रामीण भागातील गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. एक तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या कर्तव्यावर होते. यापैकीच एका अधिकाऱ्याने नगरपालिका अग्नीशमन दलास पाचारण केले होते. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आली आहे.

सदरील जळून खाक झालेला  पॉवर ट्रान्सफार्मर दुरूस्त होण्यासाठी अयोग्य असल्याने नविन ट्रान्सफार्मर बसवण्यात किती वेळ लागेल याची चिंता शहर वासीयांना भेडसावत आहे .

नळगिरी येथील डीपीला आग अकरा गावी अंधारात

उदगीर तालुक्यातील नळगीर येथील सब स्टेशनमधील मुख्य  डीपीला रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत डीपीचा संपूर्ण नुकसान झालं आहे. यामुळे नळगीर घोंसी पिंपरी नावंदी यासह अकरा गावांचा विद्युत पुरवठा कालपासून खंडित आहे.

नळगीर येथील कनिष्ठ अभियंता राम बिराजदार यांनी सांगितलं की येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रविवारपासून विद्युत पुरवठा खंडित आहे. यामुळे दुसऱ्यांकडून विद्युत पुरवठा चालू करून घेण्यासाठी काम चालू आहे. त्यादृष्टीने महावितरण कंपनी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

रविवारपासून लाईट नसल्याकारणाने सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांची प्रचंड त्रास आणि ओढाताण होत आहे. यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. आज बँकेचे कामही ठप्प आहेत. या भागातला विद्युत पुरवठा तात्काळ सुरू केल्यास सर्वसामान्य नागरिक सुटकेचा श्वास घेतील असे मत या भागातील नागरिक डॉ. शिवराज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तरZero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्थाZero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकहीZero Hour Full : धनंजय मुंडेंवर आरोप, ओबीसी आक्रमक, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget