एक्स्प्लोर

Riteish Deshmukh : रितेश देशमुखांच्या लातूर MIDC भूखंड वाटपाची चौकशी सुरू, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

Latur MIDC : देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या रितेश आणि जिनिलिया यांच्या मालकीच्या भूखंडाची चौकशी सुरू असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या मालकीच्या कंपनीला लातूरमध्ये  (Latur MIDC) देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. एमआयडीसीचे सीईओ बीपीन शर्मा या प्रकरणाची चौकशी करत असल्याची त्यांनी माहिती दिली. लातूर एमआयडीसीमध्ये रितेश आणि जिनिलिया यांच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला महिन्याभराच्या आतच 120 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. 

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)  यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) यांच्या मालकीच्या देश अॅग्रो प्रा. लि. कंपनीला देण्यात आलेल्या भूखंडाची चौकशी एमआयडीसी सचिवांकडून सुरू असल्याचं ते म्हणाले. 

काय आहेत आरोप?  

लातूर एमआयडीसी भागात 2019 पासून भूखंडासाठी 16 उद्योजकाची प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलण्यात आलं आणि रितेश-जिनिलियाच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड कंपनीला भूखंड देण्यात आला. हा भूखंड केवळ एका महिन्यात त्यांना देण्यात आला. तसेच या कंपनीला एकाच महिन्यात 120 कोटींचं कर्जही मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लातूर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधित आरोप केले आहेत.

भूखंडाचं वाटप प्रक्रियेनुसारच, कंपनीचा खुलासा 

देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या या कंपनीच्या वतीनं या प्रकरणी खुलासा करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, कंपनीसंबंधी आज काहीजणांकडून आक्षेप घेण्यात आले होते, ते वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. लातूर परिसरातील शेतकऱ्याना मदत व्हावी आणि येथे कृषी आधारित उ‌द्योगाची वाढ व्हावी या उद्देशाने देश अॅग्रोची स्थापना करण्यात आली असून सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन आधारित विशेष उत्पादने या उद्योगामध्ये घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औदयोगिक विकास महामंडळाने अतिरिक्त लातूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड या उद्योग घटकास रितसर आणि नियमानुसार लिजवर दिलेला आहे.

देश अॅग्रोचे प्रवर्तक रितेश आणि जिनिलिया देशमुख हे कायद्याचे आदर राखणारे आहेत तसेच सामाजिक भान बाळगणारे असल्याची त्यांची ओळख आहे. या उद्योगासाठी वित्तीय संस्थांनीही नियमानुसार कर्ज वितरित केले असल्याने संबंधितांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाहीत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Press Conference : Sushma Andhare कडून 'रणजीतसिंह Nimbalkar' वर सणसणाटी आरोप
Phaltan Doctor Death: डॉक्टर मृत्यू प्रकरण, कुटुंबाचा आरोप; आरोपी PSI गोपाळ बदनेचा फोन गायब?
Farmers Protest: 'आश्वासन का दिलं?', Devendra Fadnavis यांच्या 'सातबारा कोरा' घोषणेवरून बच्चू कडू आक्रमक
War of Words: 'बच्चू कडू (Bacchu Kadu) अज्ञानी, त्यांना कृषी संकट कळत नाही', किशोर तिवारींचा (Kishor Tiwari) घणाघात
Farmers Protest: 'सरकारचा आम्हाला अटक करण्याचा Plan होता', बच्चू कडूंचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
Embed widget