Railway Coach Factory : लातूर कोच फॅक्टरी प्रकल्प या महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता, मोठ्या विलंबानंतर प्रकल्पाला वेग
Latur Railway Coach Factory छ रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे कोच फॅक्टरीचे काम आयसीएफकडे (INTEGRAL COACH FACTORY) सोपावले आहे. आय.सी. एफ. कारखान्यातील दैनंदिन कामावर लक्ष ठेवणार आहे.
लातूर: लातूर एमआयडीसी (Latur News) भागामध्ये कोच फॅक्टरी ची निर्मिती करण्यात आली आहे. या कोच फॅक्टरीचे काम अंतीम टप्प्यात आले असून या महिन्यात प्रकल्प पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. मोठ्या विलंबानंतर या कामाला वेग आलाय. रेल्वे मंत्रालयाने अधिकृतपणे MCF म्हणजे मॉर्डन कोच फॅक्टरी, लातूर प्रशासन आणि अनुभवी इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी, चेन्नईकडे सोपवलंय. तसंच वंदे भारत ट्रेनच्या स्लीपरची MCF मध्ये तयार केल्या जाणार आहेत. आय.सी. एफ. कारखान्यातील दैनंदिन कामावर लक्ष ठेवणार आहे.
दीड वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये तो तयार होऊन कोच निर्मिती करण्यासाठी सक्षम आहे हे समोर ही आले होते. त्यानंतर या फॅक्टरीच्या कामाला वेग आला आहे. कोच कारखाना सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. टेंडर आणि तांत्रिक प्रक्रियेमुळे विलंब होत होता. परंतु मार्चअखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलपासून प्रत्यक्ष कोचनिर्मितीची सुरुवात झाली
देशातील चौथा कारखाना लातुरात
देशात चार ठिकाणी रेल्वेच्या डब्यांची निर्मिती करणारे कारखाने आहेत. यात तामिळनाडू येथील चेन्नई ,पंजाब येथील कपूरथळा ,उत्तरप्रदेश येथील रायबरेली आणि लातूर येथील कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी चेन्नई येथील कोच फॅक्टरी 1955 मध्ये तर कपूरथला येथील फॅक्टरी 1986 मध्ये उभारली गेली. रायबरेली येथे फैक्टरी 2009 मध्ये स्थापन करण्यात आली तरी प्रत्यक्षात डबे निर्मितीसाठी 2014 साल उजाडले. आता महाराष्ट्रात लातूर येथील मराठवाडा कोच फॅक्टरी उभारणी करून दोन वर्षे होत आली तरी अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
लातूर कोच फॅक्टरी
लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे.. 350 एकर वरील क्षेत्र आहे .. यापैकी 120 एकर वरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाला आहे.. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे तर पहिल्या फेज मध्ये वर्षाला 250 कोच .... दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणारा अवाढव्य कारखान्याच्या पहिल्या फेज ची तयार 100 टक्के पूर्ण झाली आहे ..आता प्रतीक्षा आहे कोच निर्मिती कधी होईल याची
आय.सी.एफ ( Integral Coach Factory)
चेन्नईमध्ये रेल्वेचे प्रवासी डबे बनवणारा एक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये भारतीय रेल्वेसाठी डबे बनवले जातात. आय.सी.एफ.ने आजवर अनेक देशांमधील रेल्वे कंपन्यांसाठी देखील डबे बनवले आहेत. 1995 साली हा कारखाना स्वित्झर्लंडच्या सहयोगाने चालू करण्यात आला.
हे ही वाचा :