एक्स्प्लोर

Girish Mahajan : मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका दुटप्पी, चार वेळा मुख्यमंत्री राहूनही काही केलं नाही: गिरीश महाजन

Girish Mahajan  On Maratha Reservation : शरद पवार सत्तेत होते त्यावेळी त्यांना मराठा आरक्षणाचं म देखील उच्चारलं नाही, आता त्यांचे नेते बैठकीला उपस्थित राहत नाहीत अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. 

लातूर : शरद पवार (Sharad Pawar) यांची मराठा आरक्षणाच्या प्रश्नी (Maratha Reservation) दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. शरद पवारांनी पुढाकार घ्यावा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा असं आवाहनही त्यानी केलं. लातूरचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही पुढाकार घ्या असं शरद पवारांना आवाहन करत गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत. मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही. तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही तुमच्या मागे येऊ. कारण तुम्ही एवढे दिवस सत्तेत राहिले आहेत आणि मराठा आरक्षण प्रश्न हा सर्व पक्षाच्या बैठकीतून सोडविता आला असता. पण सगळे विरोधी पक्ष हे गैरहजर राहिले. यावर काय संमजायच?

मराठा आरक्षण प्रश्न राज्यात सोडवावा

आरक्षणाचा प्रश्न राज्यानेच  सोडवावा, केंद्रात जाऊन काहीच होणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं होत. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. सर्व नेते सांगत आहेत की शरद पवारांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी आपल्या कारकीर्दीत काहीच केलं नाही. आपण मुख्यमंत्री होतात. राज्यात आपलं सरकार होतं त्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा उच्चारला नाही. आता सल्ला देता आहात, चांगलं आहे. ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते त्यावेळी बैठकीला यायचं नाही, लोकांनाही येऊ द्यायचं नाही. नंतर लोकांना उपदेश द्यायचं हे काही योग्य नाही.  

शरद पवार यांची भूमिका दुटप्पी

गिरीश महाजन म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पण त्यांच्या काळात मराठा आरक्षणाचा म सुद्धा त्यांनी उच्चारला नाही. यामुळे शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये येऊन हा प्रश्न सोडवावा असे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. शरद पवार हे बाहेर एक बोलतात आणि आतमध्ये एक बोलतात. यामुळे पवार साहेबांनी आधी भूमिका स्पष्ट करावी. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor Case : 'माझा काहीही संबंध नाही', रणजितसिंह निंबाळकरांचा दावा; पण आरोपांचं सावट कायम
Phaltan Doctor case: 'रणजितसिंह Nimbalkar यांना सहआरोपी करा', Ambadas Danve यांची मागणी
Abuse of Power: 'PSI Gopal Badane ने चारवेळा बलात्कार केला', डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर खळबळ
Phaltan News: फलटणमधील अभयच्या बातमीने खळबळ, नक्की काय आहे प्रकरण?
Mahayuti Rift: PM Modi यांच्या भेटीनंतरही शिंदे हतबल? Pune त Mohol-Dhangekar वाद सुरुच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2025 |शनिवार
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
धंगेकरांच्या आरोपात सत्य, यामध्ये मोहोळच आहेत की त्यांना आशीर्वाद देणारे अजून दिल्ली, महाराष्ट्रातील कोणी आहेत हे समजलं पाहिजे; राजू शेट्टींचा हल्लाबोल सुरुच
Phaltan Crime : फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडीत रवानगी 
Actor Satish Shah Passed Away: बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
बॉलीवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी
Shivsena : मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट
मोठी बातमी, महायुतीत समसमान जागा वाटप व्हावं, मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही
Phaltan Doctor Death: 80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
80 ते 90 पोस्टमार्टेम करणारी मुलगी स्ट्राँग नसेल का? दबाव आणून तिला जीव द्यायला प्रवृत्त केलं; डॉक्टर तरुणीच्या बहिणीचा आरोप
Phaltan Doctor Death: डॉक्टर महिलेने खासदारांनी दम दिला, असं कुठेही म्हटलेलं नाही; फोन कॉलबाबतच्या थिअरीवर रणजीतसिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण
डॉक्टर महिलेने खासदारांनी दम दिला, असं कुठेही म्हटलेलं नाही; फोन कॉलबाबतच्या थिअरीवर रणजीतसिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण
Adam Gilchrist: कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
कधीकाळी टीम इंडियाला धडकी भरवणारा अॅडम गिलख्रिस्ट म्हणतो, फक्त एक सेल्फी रोहितसोबत घेतला काय अन् अवघ्या 24 तासात...
Embed widget