एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : जरांगे-फडणवीसांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, त्यांच्यातील भांडण नकली; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Ambedkar On Maratha Reservation : भाजपने मनोज जरांगे यांच्या मागणीला कधीही विरोध केला नाही असा दावा करत देवेंद्र फडणवीस आणि जरांगे यांच्यातील भांडण नकली असल्याचा आरोप प्रखाश आंबेडकरांनी केला.

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. भाजप कुठेही जरांगेंच्या भूमिकेला विरोध करत नसून जरांगे (Manoj Jarange) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेलं भांडण नकली असल्याचा दावाही त्यांनी केला. पंढरपुरात झालेल्या आरक्षण बचाव यात्रेत प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं.

भाजप कुठेही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करत नाहीत

राजकारण समजून घ्या, जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस याचे भांडण नकली आहे असं सांगत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाने ओबीसी विरोधात भूमिका घेतली आणि जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना विरोध केला तरच हे भांडण खरं आहे हे समजून घेऊ. अन्यथा हे नकली भांडण असेल. 

भाजपने जरांगे पाटील यांच्या मागणीला कधीच विरोध केला नाही असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. ते म्हणाले की, स्वतःला फसवून घेऊ नका. यांचे दाखवायचे आणि खायचे दात एक असेल तर मत मागायला या असे आता भाजपला लोकांनी सांगितले पाहिजे. 

शरद पवारांनी पळवाट शोधू नये

ओबीसी-मराठा आरक्षण वादावर शरद पवारांची पळवाट शोधू नये असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. ते म्हणाले की, शरद पवार हे एका पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री राहिले असताना समाजहिताचे काम करताना धाडस दाखवा. शरद पवारांची ही पळवाट आहे‌. ते गेले अनेक वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेले मराठा नेते आहेत. त्यांनी तर हा प्रश्न मागेच सोडवायला पाहिजे होता. परंतु ते आता या प्रश्नावरून पळवाट काढत आहेत.
    
मराठा आणि ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवून प्रश्न सोडवावा असे आवाहन शरद पवार यांनी केले. शरद पवारांनी केलेल्या या आवाहनावर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली.  

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Speech | मुस्लीम उमेदवारावरून भाजपवर टीका, ओवैसींची संभाजीनगरमध्ये सभाABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला...'
BJP manifesto : शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या, लाडक्या बहिणींना 2100 रुपये; भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या लक्षवेधी घोषणा
BJP Sankalp patra: वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
वीजबिलात 30 टक्के सूट, 25 लाख नोकऱ्या आणि खतांवरील जीएसटी रक्कम परत मिळणार; भाजपच्या संकल्पपत्रातील गेमचेंजर घोषणा
Nitin Gadkari : पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
पिके वाढली की रोगही वाढतात, बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना प्रशिक्षण दिले पाहिजे; नितीन गडकरींची दोन महिन्यांत चौथ्यांदा फटकेबाजी
Sanjay Raut : संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
संजय राऊतांचा डबल धमाका, नाशिकमधील भाजप अन् वंचितचे दोन बडे मोहरे फोडले, ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
पहिल्यांदा लाडक्या बहिणींना धमकी, मग म्हणाले, लव्ह जिहाद होऊ नये म्हणून बोललो अन् नंतर चौफेर टीकेनंतर माफीनामा; महाडिकांचा अवघ्या काही तासात 'सेल्फगोल'!
'मी पठाण आहे, गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला या आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
'मला गोळी घालायची तर घाला', शाहरुख खानला आधीही मिळाली होती अंडरवर्ल्डची धमकी
Sanjay Raut : 1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
1500 रुपयात मतं विकत घेण्याचा प्रकार, हा केवळ तीन महिन्यांचा खेळ; संजय राऊतांचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल
Embed widget