NEET Pape Leak Case: थेट कागदपत्र घेऊन CBI पथक लातुरात दाखल; आरोपींना ताब्यात घेणार, आतापर्यंत काय-काय घडलं?
देशभरात गाजलेल्या लातूर पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील लातुरात आढळून आले आहेत. लातुरातील दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.
Latur NEET Exam Pape Leak Case: लातूर : नीट पेपरफुटी (NEET Exam) प्रकरणाचा (NEET Pape Leak Case) कसून तपास करण्यासाठी सीबीआयचं पथक (CBI Team) लातूरमध्ये (Latur News) दाखल झालं आहे. लातूरमध्ये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक असणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय पथकाकडून कागदपत्रांची तयारी देखील करण्यात आली आहे.
देशभरात गाजलेल्या लातूर पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रातील लातुरात आढळून आले आहेत. लातुरातील दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना याप्रकरणी अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. सीबीआयचं पथक पहाटे लातूरमध्ये दाखल झालं. सर्व कागदपत्रांची पाहणी करून कोर्टात हजर करण्यात आलं. अटक असणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय पथकानं कागदपत्रांचीही तयारी केलं आहे.
नीट पेपर फुटी प्रकरण देशात गाजत आहे. यात लातूर कनेक्शन उघड झालं आहे. लातूर येथे चार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जलील पठाण आणि संजय जाधव या दोन आरोपींना लातूर पोलिसांना अटक करण्यात यश आलं आहे. यातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यात गंगाधर आणि इरण्णा यांचा समावेश आहे. अटक असलेल्या दोन आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. उद्या पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
सीबीआयचं पथक पहाटे लातूरमध्ये दाखल
लातुरातील नीट पेपरफुटी प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. त्यानंतर लातुरात हालचालींना वेग आला आहे. लातूर क्राईम ब्रांच, लातूर शहर पोलीस उपाधीक्षक यांचा तपास पथकाकडून सुरू आहे. दहशतवादी विरोधी पथक यांनी केलेल्या तपासाची सर्व कागदपत्रं सकाळपासून सीबीआय अधिकाऱ्यांना तपासली आहेत. दोन्ही अधिकारी सद्यस्थितीत लातूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. यातील अटक असलेल्या आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव यांची पोलीस कोठडी उद्या म्हणजेच, दोन तारखेला संपणार आहे. त्या अगोदरच सीबीआयच्या पथकांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठीची कागदपत्राची पूर्तता केली आहे. आजच जिल्हा सत्र न्यायालयात येऊन केली आहे. यावेळी सीबीआय पथकातील दोन अधिकारी. लातूर शहर पोलीस उपाधीक्षक भागवत फुंदे आणि इतर कर्मचारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर होते.
लातूर पेपरफुटी प्रकरणातील चार आरोपी नेमके कोण?
लातूरमध्ये उघडकीस आलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात (NEET Exam Paper Leak Case) आतापर्यंत चार आरोपींचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. लातूर येथील संजय जाधव, जलीलखाँ पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरन्ना कोनगलवार, असं या प्रकरणातील चौथ्या आरोपीचं नाव असून धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI