अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला 1 कोटी 13 लाखांचा दंड, राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला 1 कोटी 13 लाख 40 हजार रुपयाचा दंड बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादा पश्चिम खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

लातूर : लातूरचे काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला 1 कोटी 13 लाख 40 हजार रुपयाचा दंड बसला आहे. राष्ट्रीय हरित लवादा पश्चिम खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. लातूर जिह्यातील 21 शुगर फॅक्टरी युनिट नंबर 3 शिवणी जामगा येथील कारखाना परिसरातील शेकऱ्यांच्या शेतात कारखान्याची राख आणि दूषित पाणी सोडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. यात काही शेतकऱ्यांची जनावरे देखील दगावली होती. तसेच पिकांचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झालं होतं.
शिवणी जामगा येथील 31 शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2023 मध्ये हरित लवादाकडं तक्रार केली. याचा निकाल 30 एप्रिल 2025 मध्ये लागला. तब्बल दोन वर्षाने हा निकाल लागला आहे. यात हरित लवादाने अमित देशमुख यांच्या मालकीचा 21 शुगर फॅक्टरी कारखान्याला 1 कोटी 13 लाख 40 हजार रुपये दंड हा पाणी आणि हवेचं प्रदूषण केल्याबद्दल ठोठावण्यात आला आहे. तर 31 शेतकऱ्यांना 54 लाख 43 हजार 955 रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून देण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
21 शुगर फॅक्टरी युनिट नंबर तीन शिवनी जामगाव येथे कार्यरत आहे. हा कारखाना सुरू असताना, आजूबाजूच्या परिसरातील शेतमालाचं प्रचंड नुकसान होत आहे. साखर कारखान्याची राख आणि दूषित पाण्यामुळं या परिसरातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं होतं. तसेच जनावर देखील दगावले. वेळोवेळी शेतकऱ्यांनी शासनाकडं पाठपुरावा केला पण त्यांना कुठलाच न्याय मिळाला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केली, प्रदूषण महामंडळाकडं निवेदन दिलं होतं. आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्याच्या पाठपुरावा केला, पण शेतकऱ्यांची कोणी दखल घेत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी पुढाकार घेतलाशेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला.
हरित लवादाचा दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय
सदरील प्रकरणाची याचिका राष्ट्रीय हरित लवाद पश्चिम खंडपीठाकडं दाखल करण्यात आली होती. हरित लवादाने दोन वर्षानंतर या प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूनं न्याय दिला आहे. तर साखर कारखान्याला 1 कोटी 13 लाख 40 हजार रुपयांचा दंड आणि शेतकऱ्यांना 54 लाख 43 हजार 995 रुपयाचा नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला आहे. प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या साखर कारखान्याची राख आणि पाण्याच्या प्रदूषणाची चाचणी केली असता, यामध्ये प्रदूषण आढळून आल्याची माहिती प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:























