'राज्यात लुटारूंची टोळी, तेच सत्ताधारी', विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले, "बेटा कितना खाया विचारत.."
लातूरमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा भरलाय. मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदार यांच्या जाहीर सत्कारासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
Latur: राज्यात लोकसभा निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून आज लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा मेळावा भरलाय. आगामी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची रणनीती काय असणार? कुणाला उमेदवारी देणार? याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचेच लक्ष लागून आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला असून राज्यात लुटारूंची टोळी आहे. तेच सत्ताधारी आहेत असं म्हणत बेटा कितना खायेगा? असं विचारत त्याच्या हातात तिजोरीची चावी दिल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
लातूरमध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा मेळावा भरलाय. मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदार यांच्या जाहीर सत्कारासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.
काय म्हणाले वडेट्टीवार?
मराठवाडा आणि काँग्रेसचे नाते भावनिक आहे. मराठवाड्याने काँग्रेसचा निकाल शंभर टक्के दिलाय. राज्यात सध्या लुटारूंची टोळी आहे. तेच सत्ताधारी आहेत. बेटा अजित वर मोदींनी आरोप केला त्यानंतर त्यांना बेटा कितना खाया असे विचारत त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या असं म्हणत त्यांनी पंतप्रधानांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका केली. सामान्य जनता याचा हिशोब घेतला शिवाय राहणार नाही असं म्हणत सर्व उद्योगधंदे गुजरातला पाठवला जात आहेत. राज्य गहाण ठेवला आहे गुजरातकडे असे म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
राहुल गांधींनी मोदींना घाम फोडला
राहुल गांधी यांनी मोदींना घाम फोडला आहे. मोदी घाबरतात आता. त्याची छाती बारीक बारीक होत आहे असं म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.
अमित देशमुख आता तुमचे रस्ते साफ झाले आहेत असं म्हणतअशोक चव्हाण गेले त्यांना जाऊ द्या तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जा..नांदेडची एक बोगी सोबत घेऊन जा.
मराठा ओबीसी भांडण लावण्याचा प्रयत्न
राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्नच तापलेला असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारने ओबीसी मराठा असे भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे.आता तसे होणार , असे म्हणाले. 2004 साली ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम विलासरावांनी केलं होतं म्हणत त्यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
तिजोरीत खडखडाट असूनही मतांसाठी पैसे उधळले
तिजोरीत खडखडाट असताना मतांसाठी पैसे उधळले जात आहेत. सर्व उद्योगधंदे गुजरातला पाठवले जात आहेत.महागाई वाढत चालली असून सामान्य जनता याचा हिशोब घेतलाशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.