Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले आहे. त्या त्या ठिकाणी प्रभाग आरक्षण सोडती काढण्यात आल्या. 9 नगरपालिकांमधील 235 जागांपैकी 138 जागांवर महिलाराज असेल.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) 9 नगरपालिकांसाठी प्रभाग आरक्षण निश्चित झाले आहे. सोमवारी त्या त्या ठिकाणी प्रभाग आरक्षण सोडती काढण्यात आल्या. या आरक्षण सोडतीनंतर 9 नगरपालिकांमधील 235 जागांपैकी 138 जागांवर महिलाराज असेल. प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आलेल्या नगरपालिकांमध्ये इचलकरंजी (महापालिका झाली असूनही नगर पालिका आरक्षण), मुरगुड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, पेठवडगाव, मलकापूर, पन्हाळा, कागल समावेश आहे.
प्रभाग रचना निश्चित झाल्याने आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबत सर्वसाधारण अंदाज आला होता. त्यामुळे नागरिकांचा आरक्षण सोडतीवेळी निरुत्साह दिसून आला. आरक्षण सोडतीवर 15 ते 21 जून या कालावधीमध्ये हरकती स्वीकारल्या जातील. 24 जूनला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायानंतर विभागीय आयुक्तांना हरकती सादर केल्या जातील. तर 29 जून रोजी विभागीय आयुक्तांकडून आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं जाईल. याबाबत अंतिम माहिती 1 जुलैला प्रसिद्ध होईल.
कोणत्या नगरपालिकेत कसं आरक्षण असेल ?
अलीकडेच महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेत 64 पैकी 32 जागांवर महिलाराज असेल. जयसिंगपूर नगरपालिकेत 26 पैकी 13 जागांवर महिला आरक्षित झाल्या आहेत. मुरगुड, मलकापूर, पेठवडगाव, कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये 20 पैकी 10 जागा महिलांसाठी असतील. कागल नगरपालिकेत 23 पैकी 11 जागांवर महिला असतील. गडहिंग्लजमध्ये 22 पैकी 11 जागांवर महिला असतील. गडहिंग्लज अनुसुचित जातीच्या महिला राखीव प्रवर्गाचाही समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- छत्रपतींनी असं बोलणं अशोभनीय, माझी विनंती आहे, असं करु नका, नाहीतर...; संजय पवारांचा संभाजीराजेंना इशारा
- Samarjeetsinh Ghatge : हसन मुश्रीफ तुमचं सरकारमध्ये राजकीय वजन आहे की नाही ? अजित पवार, जयंत पाटील सांगूनही कागलला आले नाहीत
- Kolhapur : Dhananjay Mahadik यांचे गुरू, कोल्हापुरातील बाहुबली - Mahadevrao Mahadik Special Report
- Dhananjay Mahadik : आठ वर्षांनी गुलाल लागताच धनंजय महाडिक म्हणाले, भाजपने दिलेल्या संधीची या जन्मात तरी उतराई होणार नाही