Shahu Maharaj : शाहू महाराजांच्या व्हायरल फोटोमागील सत्य समोर; सतेज पाटलांनी माफी मागायला लावल्याचा मजकूर व्हायरल
सोशल मीडियात मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींना माफी मागायला लावली अशा प्रकारचा मजकूर व्हायरल होत आहे.
कोल्हापूर : विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापुरातील मुस्लिम महिला 14 जुलै रोजी घडला प्रकार छत्रपती शाहू महाराजांना विशद करत होत्या. यावेळी एका महिलेनं शाहू महाराजांना आलेल्या दंगलखोर लोकांनी माझ्या कानातील दागिने काढून घेतलं असं सांगत होत्या, त्यावेळी शाहू महाराजांना त्या महिलांचा आवाज व्यवस्थित आला नाही.
छत्रपतींना माफी मागायला लावली अशा प्रकारचा मजकूर व्हायरल
त्यांनी स्वतःच्या कानाला हात लावून कानातले गेलं का असा विचारले. त्यानंतर हीच गोष्ट आमदार सतेज पाटील यांना देखील शाहू महाराज यांनी कानाला हात लावून सांगितली. पण सोशल मीडियात मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींना माफी मागायला लावली अशा प्रकारचा मजकूर व्हायरल होत आहे. मात्र संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मजकूर हा जाणून बुजून केला जात असल्याचे दिसते.
View this post on Instagram
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून या प्रकरणावर जोरदार टीका करण्यात आली आहे हे सर्व भाजप करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय पवार यांनी केला आहे.
शाहू महाराजांकडून विशाळगडाची पाहणी
शाहू महाराज मंगळवारी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी ज्या मशिदीती तोडफोड झाली तिथे जाऊन आढावा घेतला. यानंतर शाहू महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शाहू महाराजांना पाहताच मुस्लीम महिलांनी टाहो फोडत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. रविवारी विशाळगडाच्या परिसरात काय घडलं? कशाप्रकारे तोडफोड करण्यात आली? कोणाचं नाव घेऊन तोडफोड केली जात होती, याची माहिती स्थानिकांनी शाहू महाराजांना दिली. आम्ही उभ्या आयु्ष्यात असा प्रकार कधी पाहिला नव्हता. आम्ही इकडे-तिकडे पळून गेलो म्हणून जीव वाचला, असे स्थानिकांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या