Kolhapur Heavy Rain : कोल्हापूरमध्ये प्रलयकारी पावसाचा प्रकोप सुरुच; जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वीज कोसळली
Kolhapur Heavy Rain : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाचच्या सुमारास आलेल्या प्रलयकारी पावसाने पुन्हा एकदा वाताहत केली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचे लोट वाहू लागले.
Kolhapur Heavy Rain : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रकोप सुरुच आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या प्रलयकारी पावसाने पुन्हा एकदा वाताहत केली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये रस्त्याच्या दुतर्फा लोट वाहू लागल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. शहरातील सखल भागामध्ये पाणी साचून तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही.
वीजाच्या गडागडाटांस सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पावसाने अक्षरश: धुमशान घालताना कोल्हापूर शहराला झोडपून काढले. यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये रस्त्यांवर पाण्याचा लोंढा सुरु झाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पावसाचा प्रकोप सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिके धोक्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यावरील संकट कायम
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर शहर परिसरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. असे असतानाच हवामान विभागाकडून कोल्हापूरसह (kolhapur Rain Alert) 9 जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणमधील परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर तसेच मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या दुप्पट पाऊस
ऑक्टोबर महिना कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ज्या ठिकाणी पाऊस कमी होणे अपेक्षित असताना तब्बल 129.2 मिमी पाऊस झाला. विशेष आजवरची आकडेवारी पाहिल्यास हाच पाऊस 60 मिमीच्या वर पडत नव्हता.
गगनबावडा, शिरोळ, पन्हाळा, हातकणंगले तालुक्यात कहर
दरम्यान, परतीच्या पावसाने सर्वाधिक कहर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये झाला. यामध्ये गगनबावडा, पन्हाळा, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांचा समावेश आहे. गगनबावडा तालुक्यात 282.9 मिमी पाऊस झाला. हातकणंगले तालुक्यात 205 मिमी पाऊस झाला. शिरोळमध्ये 143.9 मिमी पाऊस झाला. पन्हाळा तालुक्यात 163.4 मिमी पाऊस झाला.
इतर महत्वाच्या बातम्या