एक्स्प्लोर

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर 

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील चारपैकी 3 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाले आहेत. आजरा तालुक्यातील करपेवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे.   

Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील चारपैकी 3 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाले आहेत. आजरा तालुक्यातील करपेवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे.   

फये ग्रामपंचायत, भुदरगड

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील फये ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने सत्ता मिळवली. सरपंचपदी शिंदे गटाच्या नकुशी धुरे विजयी झाल्या. पंचायतमधील 7 पैकी 3 जागा शिंदे आणि भाजप गटाने जिंकल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या. मात्र, सरपंच शिंदे आणि भाजप गटाचा विजयी झाला. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्यात लढत झाली. 

इसापूर ग्रामपंचायत, चंदगड

इसापूर ग्रामपंचायतीमध्ये एकूण जागा 7 जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीने 5 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीला 2 जागा मिळाल्या. सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीचा सरपंच निवडून आला. 

बरगेवाडी ग्रामपंचायत, राधानगरी

बरगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून अपक्ष उमेदवार जयवंत बरगे विजयी झाले आहेत. निवडणुकीपूर्वी  3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, सर्वसाधारण महिला उमेदवार नसल्याने एक जागा रिक्त आहे. 

कोल्हापूर जिल्‍ह्यातील 475 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्‍हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 31 मे 2022 पर्यंत अस्‍तित्‍वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 21 ऑक्‍टोबरला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीस पात्र असणाऱ्या‍ सर्व ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. 

जिल्‍ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक महिनाभरात होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात 1, नोव्हेंबर महिन्यात 429, तर डिसेंबर महिन्यामध्ये 45 ग्रामपंचायतीचा कालावधी संपणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. 

येत्या तीन महिन्यात मुदत संपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती 

  • करवीर 53
  • कागल 26 
  • पन्हाळा 50
  • शाहूवाडी  49
  • हातकणंगले 39 
  • शिरोळ 17
  • राधानगरी 66
  • गगनबावडा 21 
  • गडहिंग्लज34 
  • आजरा 36 
  • भुदरगड 44
  • चंदगड 40

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget