एक्स्प्लोर

Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना

Kolhapur LPG Cylinder Shortage:कोल्हापूर जिल्ह्यासाठी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली आहे.

Kolhapur LPG Cylinder Shortage: इराणविरोधातील अमेरिका आणि इस्त्रायलने पुकारलेल्या युद्धाचा आज (13 मार्च) 14 वा दिवस आहे. मात्र, त्याचे चटके भारताला सर्वाधिक बसू लागले आहेत. पेटलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणावर गॅस बुकिंगसाठी गर्दी करत असून, यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यासाठी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली आहे. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत हॉटेल आणि उद्योगांसाठीचा व्यावसायिक (कमर्शियल) गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. हा सर्व साठा आता घरगुती ग्राहकांसाठी वळवण्यात आला आहे. कमर्शियल गॅस केवळ रुग्णालये, निवासी संस्था आणि आश्रमशाळा यांसारख्या अत्यावश्यक सेवांनाच पुरवला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. 

लग्न समारंभ आणि कॅटरर्ससाठी सूचना

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने कॅटरर्ससमोर अडचण निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे आधीचा कमर्शियल साठा शिल्लक आहे, ते आपले काम करू शकतात. मात्र, नव्याने व्यावसायिक बुकिंग घेतले जाणार नाही. यावर बोलताना चव्हाण यांनी मिश्किलपणे पण स्पष्टपणे सांगितले की, "ज्यांच्याकडे गॅसची सोय नाही, त्यांनी थोडंसं लग्न पुढे ढकललं तर काही हरकत नाही." तीन लोकप्रतिनिधींच्या घरातील मोठ्या लग्नांबाबत विचारले असता, त्यांच्याकडे आधीच कमर्शियल साठा उपलब्ध असल्याने ती लग्ने निर्विघ्न पार पडतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुबलक साठा आणि बफर स्टॉक सज्ज

कोल्हापूर जिल्ह्याची दैनंदिन गरज साधारणतः 28 ते 29 हजार गॅस सिलिंडरची आहे. तिन्ही प्रमुख गॅस कंपन्यांकडून हा पुरवठा सध्या अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी कंपन्यांकडे 3 दिवसांचा अतिरिक्त 'बफर स्टॉक' राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे टंचाईची कोणतीही शक्यता सध्यातरी दिसत नाही, असे त्यांनी म्हटलं आहे. 

बुकिंगमध्ये तांत्रिक अडथळे का?

मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं की, अनेक ग्राहकांना सध्या ओटीपी (OTP) न येणे किंवा सॉफ्टवेअर हँग होणे अशा समस्या जाणवत आहेत. यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी सांगितले की, "युद्धाच्या भीतीमुळे संपूर्ण भारतातून एकाच वेळी लोक मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे कंपन्यांच्या सर्व्हरवर प्रचंड ताण आला आहे. ही अडचण पूर्णपणे तांत्रिक आणि तात्पुरती असून नागरिकांनी संयम बाळगावा."

नियमांत बदल: आता 25 दिवसांनंतरच बुकिंग

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गॅस कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बुकिंगच्या मुदतीत बदल केला आहे. आता 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच नवीन सिलिंडर बुक करता येईल. ग्रामीण भागात हाच नियम 45 दिवस करण्यात आला आहे. त्या म्हणाल्या की, "एका सामान्य कुटुंबाला एक सिलिंडर किमान 30 ते 32 दिवस पुरतो. 25 व्या दिवशी बुकिंग केले तरी पुढील 5-6 दिवसांत गॅस घरपोच मिळेल. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर रांगा लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही," असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पाईपलाईन गॅस धारकांना इशारा

कोल्हापूर आणि इचलकरंजीमधील सुमारे 11 हजार घरांमध्ये पाईपलाईन गॅस सुविधा आहे. असे असतानाही अनेक ग्राहक जुने कनेक्शन असल्याचे सांगून विनाकारण सिलिंडरचे बुकिंग करत आहेत. अशा ग्राहकांचा डेटा गोळा करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असून, सिस्टीमवर विनाकारण ताण आणणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्या म्हणाल्या. 

तक्रार कोणाकडे करावी?

  • जर वारंवार प्रयत्न करूनही तांत्रिक कारणास्तव बुकिंग होत नसेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता खालील माध्यमांशी संपर्क साधावा:
  • गॅस कंपन्यांचे कस्टमर केअर (Customer Care)
  • जिल्हा प्रशासन (पुरवठा विभाग)
  • संबंधित कंपन्यांचे सेल्स ऑफिसर्स (Sales Officers)

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget