Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तीन मार्ग ठरले! पण महाद्वार रोडसाठी काय निर्णय झाला?
Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन कशा पद्धतीने होणार याबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक पार पडली.
Kolhapur Ganesh 2022 : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन कशा पद्धतीने होणार याबाबत पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तीन मार्गांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शाहू स्मारकमध्ये झालेल्या या बैठकीसाठी शेकडो मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी तीन मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. वेळेचे बंधन प्रत्येक मंडळावर असेल.
दरम्यान, पंचगंगा नदीमध्ये बाप्पाचे विसर्जन केले जाणार नाही. इराणी खाणीमध्येच गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व गणेश मंडळांना बोलवून मिरवणुकीचे तीन मार्गे सांगण्यात आले. त्या त्या भागातील मंडळांनी दिलेल्या मिरवणूक मार्गानेच बाप्पाची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याची आहे. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय रहावा यासाठीचे हे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून मिरणवणुकीसाठी जे दोन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत त्या मार्गावरून जाण्यास बहुतांशी मंडळांनी मान्यता दिली आहे. ज्यांना पर्यायी मार्ग मान्य नसेल त्या मंडळांना महाद्वार रोडवरून जाण्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्या काढून प्रवेश देण्यात येणार आहे.
पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असा असेल
- खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशर चौक
पर्यायी मार्ग
- सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, क्रशर चौक, इराणी खाण
- उमा टॉकीज, काॅमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशर चौक
कोल्हापूर जिल्ह्यात मूर्तिदान चळवळीला शंभर हत्तींचे बळ!
दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत एकूण 2 लाख 58 हजार 932 मूर्ती संकलन, तर सुमारे 516 टन इतके निर्माल्य संकलन करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. विशेषत: या उपक्रमांतर्गत 1986 गणेशमुर्तींचे विजर्सन हे घरच्या घरीचं करण्यात आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 14 हजार अधिक मुर्तिदान झाल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या