एक्स्प्लोर

KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आता 25 जणांचे होणार

KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील सदस्य संख्या 21 वरून आता 25 होईल.

KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतील सदस्य संख्या 21 वरून आता 25 होईल. 16 सप्टेंबर रोजी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. 
 
संचालक संख्या वाढवताना दूध व महिला गटातून प्रत्येकी 1, तर अन्य गटातून दोन प्रतिनिधींचा समावेश केला जाणार आहे. दरम्यान, सर्वसाधारण बैठकीवर संचालक संख्या वाढवण्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला जाईल. 

जिल्हा बँकेत संचालक मंडळाची 25 होती, पण निर्बंध घालण्यात आल्यानंतर ती संख्या 21 करण्यात आली होती.तथापि हा निर्णय राज्य सरकारकडून  बदलण्यात आल्यानंतर जिल्हा तसेच राज्य पातळीवरील 21 वरून 25 करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने बैठक घेत संचालक मंडळ 25 पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. 

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार

कोल्हापूर जिल्हा बँकेमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा विचार सुरु केला आहे. अनेक शाखांमध्ये कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने त्याचा सेवेवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे मानधन तत्वावर निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा विचार सुरु झाला आहे.त्यामुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा होऊन गैरसोय थांबेल, असा कयास बँकेचा आहे.

कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाने वर्चस्व कायम ठेवलं आहे. 21 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 15 जागांसाठी मतदान झाले होते. सत्तारूढ गटाचे नेते बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील,आमदार पी. एन. पाटील,आमदार राजेश पाटील,माजी आमदार अमल महाडिक हे सहा जण त्यांच्या तालुक्यातून सेवा संस्था गटातून बिनविरोध विजयी झाले होते. 

सध्याचे जिल्हा बँकेतील संचालक कोण आहेत? 

विकास सेवा संस्था गट

  • आजरा- सुधीर देसाई
  • भुदरगड -रणजितसिंह पाटील
  • गडहिंग्लज- संतोष पाटील
  • पन्हाळा- आमदार विनय कोरे
  • शाहुवाडी- अपक्ष रणवीरसिंह गायकवाड
  • शिरोळ- डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

इतर मागासवर्गीय गट

  • विजयसिंह माने

इतर शेती संस्था व व्यक्ती सभासद गट

  • प्रताप उर्फ भैय्या माने

अनुसुचित जाती गट

  • आमदार राजू आवळे

भटक्या विमुक्त जाती जमाती

  • स्मिता गवळी

महिला प्रतिनिधी गट

  • निवेदिता माने
  • श्रुतिका काटकर

प्रक्रिया गट

  • संजय मंडलिक
  • बाबासाहेब पाटील

नागरी बॅंक पतसंस्था गट

  • अर्जुन आबिटकर

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget