Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणूक; अंतिम मतदार यादी जाहीर
शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) अधिसभेची (shivaji university senate election 2022) निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 36 हजार 343 उमेदवार पात्र ठरले आहेत.
Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) अधिसभेची (shivaji university senate election 2022) निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 36 हजार 343 उमेदवार पात्र ठरले आहेत. प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन शिक्षक यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 49 हजार पदवीधरांकडून नोंदणी करण्यात आली होती. त्यामधील 36 हजार 343 पदवीधरांची नावे मतदार म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. ही संपूर्ण यादी विद्यापीठ वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध आहे.
शिवाजी विद्यापीठ अधिसभेसाठी 14 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 16 नोव्हेंबरला निकाल जाहीर करण्यात येईल. चालू अधिसभेची मुदत संपून दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. विद्यापीठातील अधिविभाग आणि विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर यासाठी मतदान करतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात.
अधिसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने विद्यापीठ विकास मंच व विद्यापीठ विकास आघाडी यांच्यातील जागावाटपाकडे लक्ष लागले आहे. विद्यापीठातील इतर संघटनांकडेही लक्ष असेल. समविचारी संघटना, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून पदवीधर नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला होता.
सिनेट निवडणुकीसाठी मतदारयादी पुढीलप्रमाणे
- प्राचार्य - 93
- व्यवस्थापन प्रतिनिधी - 116
- विद्यापीठ शिक्षक - 166
- पदवीधर - 36, 343
- महाविद्यालय शिक्षक - 2945
- महाविद्यालय विभाग प्रमुख - 937
पुढील निवडणूक कार्यक्रम अशा पद्धतीने असेल
- 14 ऑक्टोबर : निवडणूक सूचना प्रसिद्ध करणे
- 28 ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिवस
- 31 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जाची छाननी करणे
- 1 नोव्हेंबर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस
- 2 नोव्हेंबर : उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे अपील
- 3 नोव्हेंबर : अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल
- 14 नोव्हेंबर : मतदान
- 16 नोव्हेंबर : निकाल जाहीर होणार
अशी असेल शिवाजी विद्यापीठाची अधिसभा
महाविद्यालयीन शिक्षक 10, नोंदणीकृत पदवीधर 10, प्राचार्य 10, संस्थाचालक 6, शिक्षकेतर कर्मचारी 1, विद्यापीठ अधिविभाग, प्रशासन कर्मचारी 1, विद्यापीठ प्राध्यापक 3, राज्यपाल नियुक्त प्रतिनिधी 10, विधान परिषद 2, विधानसभा 1, स्थानिक स्वराज्य संस्था 1