एक्स्प्लोर

Startup : शिवाजी विद्यापीठात 14 ऑक्टोबरला स्टार्ट अप यात्रा प्रशिक्षण शिबीर; नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन 

Startup : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठात 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

Startup : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठात 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना असणाऱ्या व्यक्तींनी (स्टार्टअप) www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नवकल्पना नोंदवून शिबीरात आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे. 

नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी तंत्रज्ञान विभाग (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र होणार आहे. यात पहिल्या सत्रामध्ये विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 12 वाजता सादरीकरणाची संधी देण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवार, उद्योजकांनी सादरीकरणाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, उर्जा अशा सर्व क्षेत्रांचा समावेश असेल. ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, इतर कुठलीही समस्या व त्यावरील नाविन्यपूर्ण उपाय यावर सादरीकरण असावे. राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स यासारखे लाभ पुरवण्यात येणार आहेत. 

अधिक माहितीकरिता जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 येथे संपर्क साधावा. स्टार्टअप यात्रेकरीता वयाची कोणतीही अट नाही.  कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, विद्यार्थी  व नाविन्यता परिसंस्था यांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकाचे 25 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाचे 15 हजार रुपये, तर क्रमांकाला 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम  सादरीकरणातून राज्यस्तरावर  निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रत्येक सेक्टर मधून महिला उद्योजिका, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अशी निवड केली जाणार आहे. त्यांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 1 लाख रुपये व 75 हजार रुपये अशी 21 बक्षिसे दिली जाणार आहेत.

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Kolhapur Crime News: सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर
सियापेक्षा डेंजर निघाला 'तो', शेवटी प्रेमालाही संपवलं, पोलिसांना सांगितली चक्रावून टाकणारी स्टोरी, एका चुकीने गेम ओव्हर, चॅटमधून धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget