एक्स्प्लोर

यशवंतराव चव्हाणांनी साकारलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा घाट, परराज्यातील भाजप आमदार कोल्हापुरात येऊन मोर्चा काढणार

Shivaji University : यशवंतराव चव्हाणांनी साकारलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा घाट, परराज्यातील भाजप आमदार कोल्हापुरात येऊन मोर्चा काढणार

Shivaji University, कोल्हापूर : कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय..शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन पुकारलय..तर याला शिवप्रेमी.. पुरोगामी जनतेनं बैठक  घेवून विरोध केलाय..दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य बैठकीतही याचे पडसाद उमटलेत..यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोगामी कोल्हापूरकर आमनेसामने आल्याचं समोर आलयं..पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट..

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाची स्थापना 18 नोव्हेंबर 1962 रोजी झालीये..तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ साकारलं..गेली 62 वर्ष झाली शिवाजी विद्यापीठ या नावानेच विद्यापीठाची कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यात ओळख आहे..दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी भूमिका घेतली आहे..विद्यापीठाचं नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं अशी मागणी आता जोर धरू लागलीयं..याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने 17 मार्चला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे..या मोर्चात भाजपचे तेलंगणातील आमदार टी.राजा हे देखील सामील होणार आहेत. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीये. 

टी राजा काय काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी सारा हिंदू मैदानात आहेत. कोल्हापुरातील सर्व हिंदुंनो मी कोल्हापुरात येत आहे. 17 मार्च रोजी दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराज यांना छत्रपती या पदवीपासून कोण रोखत आहे? कोण आमच्या इतिहासावर आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करत आहे? या सर्वांना आव्हान देण्यासाठी मी कोल्हापुरात येत आहे, असं भाजपचे परराज्यातील आमदार टी राजा म्हणाले आहेत. 

दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराला शिवप्रेमी आणि पुरोगामी कोल्हापूरकरांनी कडाडून विरोध केलायं..छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत.. परंतु शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे..या शब्दामध्येच प्रचंड ताकद आहे..त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाच नामांतरण होवू देणार नसल्याची भूमिका कोल्हापूरकरांनी घेतलीय..

 शिवाजी विद्यापीठाच्या  आज झालेल्या सिनेट सदस्य बैठकीत ही याचे तीव्र पडसाद उमटलेतं..आमच विद्यापीठ..शिवाजी विद्यापीठ अशा घोषणा देत नामांतराला विरोध दर्शविण्यात आलायं..यावेळी सदस्यांनी मांडलेला स्तगन प्रस्ताव प्रशासनाने स्विकारला नसल्याने बैठकीतच निषेधाचे पत्रकं सदस्यांनी भिरकवलेतं..त्यानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने सिनेट सदस्यांचा स्तगन प्रस्ताव स्विकारलायं...मात्र पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठाच्या नावावरून नवा वाद उभा राहिलाय....

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget