एक्स्प्लोर

Shivsena on Sanjay Mandlik : शंभर खोके, भाडोत्री खासदार मंडलिक ओके! कोल्हापुरात संजय मंडलिकांविरोधात शिवसैनिकांचे आंदोलन 

Shivsena on Sanjay Mandlik : शिंदे गटातील बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी भाडोत्री शब्द वापरल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूरमध्ये आंदोलन करत कडक इशारा दिला.

Shivsena on Sanjay Mandlik : कथित बनावट प्रतिज्ञापत्र आरोपांवरून कोल्हापूरमध्ये शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. शिंदे गटातील बंडखोर खासदार संजय मंडलिक यांनी भाडोत्री शब्द वापरल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापूरमध्ये आंदोलन करत कडक इशारा दिला. शिवसैनिकांचा भाडोत्री असा उल्लेख केल्याचा संताप या आंदोलनात पहायला मिळाला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोल्हापूरमध्ये खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवसैनिकांना भाडोत्री हा शब्द वापरल्याबद्दल हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी खासदार मंडलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची मुंबई गुन्हे शाखेकडून कोल्हापुरात चौकशी सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेला भाडोत्री शिवसैनिक आणायची गरज नव्हती असं वक्तव्य केलं होतं. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडलिक यांना खासदार करण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले आणि याच मंडलिकांनी विश्वासघात केला. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता 2024 च्या निवडणुकीत मंडलिक यांना धूळ चारेल. 100 खोके, भाडोत्री संजय मंडलिक ओके ही टॅगलाईन आम्ही घराघरात पोहाचवणार असल्याचे संजय पवार म्हणाले. 

भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत

दरम्यान, संजय मंडलिक यांनी काल प्रतिज्ञापत्रावरून बोलताना टीका केली होती. शिवसैनिकांना अशा पद्धतीने काम करण्याची गरज नाही. जो सच्चा शिवसैनिक आहे तो प्रतिज्ञापत्र देईलच, पण बोगस करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायचं, पण खऱ्या शिवसेनेचा विचार कोणी सोडला हे लक्षात येत आहे. त्यामुळे भाडोत्री माणसं गोळा करावी लागत आहेत. बनावट प्रतिज्ञापत्र सक्षम अधिकारी चूक की बरोबर ठरवतील. 

70 टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे 

दरम्यान, शिंदे गटाला ढाल आणि तलवार चिन्ह मिळालं असलं, तरी ते तात्पूरतं आहे. शिवधनुष्य चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. संजय मंडलिक म्हणाले, खोटी शपथपत्र मुंबईत सापडली त्याचा  तपास महाराष्ट्रात सुरु आहे. सच्च्या शिवसैनिकांनी खोट्या पद्धतीची कागदपत्रे तयार करायला नको होती, न्यायालयात त्याचा निकाल होईल. 70 टक्के लोकप्रतिनिधी शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे सिद्ध झालं आहे  त्यामुळे केविलवाणा प्रयत्न त्या शिवसेनेनं करू नये. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा कोमी शेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget