एक्स्प्लोर

Sharad Pawar : सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं! कोल्हापुरी बॅनर्सची रंगली एकच चर्चा

कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) राज्यात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) दमदार यश मिळवताना तब्बल 30 जागा जिंकल्या आहेत. सांगलीमधील अपक्ष विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या 31 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्याने शरद पवारांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आह. पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगडा झटका दिला आहे. 

सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं

नेमका आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली आहे. कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगलाच चर्चेला विषय झाला आहे. स्टँड परिसरातील लावलेला हा बॅनर युवा कार्यकर्ते कल्पेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी फोडल्यानंतर कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती असल्याने हे नेते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठिशी होते. मात्र, संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर कागल मतदारसंघ हा मुश्रीफ आणि मंडलिक यांचा बालेकिल्ला असूनही अपेक्षित मताधिक्य घेता आलं नाही. 

दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना बारामती, शिरुर, माढा मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. त्यामुळे अजित पवार गट पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा जोरदार लीड घेत अजित पवार यांना शरद पवार यांनी चांगलाच धोबीपचाड दिला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा इशाराच एकप्रकारे दिला आहे.  लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मार्गावर असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील या उपरोधिक बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget