एक्स्प्लोर

Kolhapur Loksabha : कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसने 25 वर्षांनी झेंडा फडकवला, पण हक्काच्या दोन विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घटले!

कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद जास्त असल्याने जागा सतेज पाटील यांनी आपल्याकडे खेचली होती. आता विजयही खेचून आणल्याने त्यांच्या इलेक्शन मॅनेजमेंटवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे.

कोल्हापूर : फक्त करवीरनगरीच नव्हे, तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आणि करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी 1 लाख 54 हजार 964 मतांनी विजय मिळवला. शाहू महाराज यांच्या विजयाने कोल्हापूरचा शाहू-फुले-आंबेडकर पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये आणखी बुलंद होणार आहे. विरोधी संजय मंडलिक यांना 5 लाख 99 हजार 558 इतके मताधिक्य मिळाले. पोस्टल मतदानापसून ते शेवटच्या फेरीपर्यंत शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी कायम राहिली. प्रचारातील एकसंधपणाही काँग्रेससाठी निर्णायक ठरला. 

कोल्हापूर लोकसभेला काँग्रेस खासदार निवडून आल्याने काँग्रेसचा 25 वर्षांपासूनचा दुष्काळ संपला आहे. 1998 नंतर प्रथमच काँग्रेसचा खासदार विजय मिळवला आहे. कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद जास्त असल्याने जागा सतेज पाटील यांनी आपल्याकडे खेचली होती. आता विजयही खेचून आणल्याने त्यांच्या इलेक्शन मॅनेजमेंटवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर या दोन मतदारसंघात घटलेलं मताधिक्य तसेच कागलमध्ये मुश्रीफ सोबत असूनही मंडलिकांना न मिळालेल्या मताधिक्याने विधानसभेला अनेकांची काळजी वाढली आहे. 

सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य 

कोल्हापूर लोकसभेत कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, राधानगरी-भुदरगड, कागल आणि चंदगड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. महायुती असल्याने कागलमध्ये संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे एकत्र होते. मात्र, तिन्ही नेते एकत्र असूनही संजय मंडलिक यांना अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने निवडणुकीत निर्माण झालेला भ्रमाचा भोपळा फुटला गेला आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत 1 लाख 17 हजारांवर मते मुश्रीफ यांना मिळाली होती. समरजित घाटगेंना 88 हजारांवर मते मिळाली होती. मात्र, कागलमधील मंडलिकांना मिळालेले मताधिक्य पाहता त्यांची मते गेली कोणीकडे असा प्रश्न उपस्थित होतो. संजय मंडलिकांना कागलमध्ये अवघ्या 13 हजार 858 मतांची आघाडी मिळाली आहे. अन्य पाच मतदारसंघात महाराज आघाडीवर आहेत. 

कागलमध्ये विधानसभेची रंगत वाढली 

कागलमध्ये अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने संजय मंडलिकांच्या दाव्यातील हवा निघाली आहे. मात्र, अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने मंत्री हसन मुश्रीफ आणि घाटगे यांचंही टेन्शन वाढलं आहे. संजयबाबा घाटगे यांनी महाराजांना साथ दिली होती. त्यामुळे कागलमधील त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडल्याचे महाराजांना मिळालेल्या मताधिक्यातून दिसून येते. विधानसभेला दोन घाटगे आणि मुश्रीफच असतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगेंना निश्चितच सोपा पेपर नाही. 

कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये काठावर मताधिक्य 

कोल्हापूर लोकसभेला आजघडीला कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि विधानपरिषदेतील दोन आमदार असे पाच आमदार आहेत. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांनी करवीरमध्ये दिलेल्या मताधिक्याने महाराजांना विजय निश्चित झाल्याचे दिसून येते. मात्र, कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालेलं नाही. कोल्हापूर दक्षिणमधून अवघ्या 6 हजार 702 मतांची आघाडी शाहू महाराजांना मिळाली. कोल्हापूर उत्तरमध्ये 14 हजार 528 मतांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार आहेत. दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील, तर उत्तरमध्ये जयश्री जाधव आमदार आहेत. शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजेश क्षीरसागर यांनाही हा धोक्याचा इशारा आहे. 

राधानगरीमध्येही महाराजांना लीड 

राधानगरी आणि करवीमध्ये मिळालेल्या मताधिक्याने शिंदे गटाच्या आजी माजी आमदारांनाही संदेश दिला गेला आहे. प्रकाश आबिटकर शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, राधानगरीतून 65 हजारांवर लीड मिळाले आहे. आबिटकर यांनी केलेली बंडखोरीचा अजूनही शिवसैनिकांमध्ये राग आहे. करवीरमध्ये मिळालेल्या मताधिक्याने चंद्रदीप नरके यांनाही उचित संदेश विधानसभेसाठी गेला आहे. त्यामुळे विधानसभेला तयारी करताना शिंदे गटाच्या आजी माजी आमदारांना मोठं आव्हान असणार आहे. 
कोल्हापूर लोकसभा मतदार संघ

1. चंदगड विधानसभा मतदार संघ

शाहू महाराज - 108594
संजय मंडलिक - 99656

2. राधानगरी विधानसभा मतदार संघ

शाहू महाराज- 146107
संजय मंडलिक- 80503

3. कागल विधानसभा मतदार संघ

शाहू महाराज- 114023
संजय मंडलिक- 127881 

4. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ

शाहू महाराज-  123873
संजय मंडलिक- 117171

5. करवीर विधानसभा मतदार संघ

शाहू महाराज- 156780
संजय मंडलिक- 85385

6. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ

शाहू महाराज - 100946
संजय मंडलिक- 86418

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 05 November 2024Raju Latkar On Satej Patil : मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिलाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Embed widget