Sanjay Mandlik : शाहू महाराजांना निवडणुकीला उभं करण्याचे शरद पवारांचे षड्यंत्र; संजय मंडलिकांची टीका, समरजित घाटगेंवरही बोलले!
सर्व्हेवर बोलताना संजय मंडलिक यांनी माझ्या बाबत निगेटिव्ह सर्व्हे नव्हता, लोकांनी भरभरून मतदान दिल्याचे ते म्हणाले. जनमत नाही हे कुजक्या मेंदूचे काम असून याचा शोध घेत आता बसत नाही, असे ते म्हणाले.
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेला (Kolhapur Loksabha) शाहू महाराजांना (Shahu Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात उभा करण्याचं षड्यंत्र शरद पवार (Sharad Pawar) यांचं असल्याची टीका खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केली आहे. ते आज (16 मार्च) कोल्हापूरमध्ये बोलत होते. मंडलिक यांनी बोलताना शरद पवार देशाचे मोठे नेते असल्याचे सांगत जुना इतिहास यावेळी सांगितला. ते म्हणाले की त्या काळात पवारांच्या विरोधामध्ये मंडलिक साहेब होते, पण पवार साहेबांना जुना कोणत्या तरी काढायचा असेल म्हणून शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करुन षड्यंत्र असल्याचा आरोप मंडलिक यांनी केला. दरम्यान उमेदवारीवर पुन्हा एकदा संजय मंडलिक यांनी दावा केला.
दरम्यान सर्व्हेवर बोलताना संजय मंडलिक यांनी माझ्या बाबत निगेटिव्ह सर्व्हे नव्हता, लोकांनी भरभरून मतदान दिल्याचे ते म्हणाले. जनमत नाही हे कुजक्या मेंदूचे काम असून याचा शोध घेत आता बसत नाही, असेही मंडलिक म्हणाले.
संजय मंडलिक म्हणतात, श्रीकांत शिंदेंचा फोन आला
माझी उमेदवारी लवकरच जाहीर होणार असून कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे, असे संजय मंडलिक यांनी सांगितले. श्रीकांत शिंदे यांचा फोन आल्याचेही ते म्हणाले. त्यांनी तुम्ही अस्वस्थ आहात का? असे विचारले. उमेदवारी जाहीर होईल असे त्यांनी सांगितलं असल्याचे मंडलिक म्हणाले. दरम्यान कालच्या मेळाव्यावर बोलताना संजय मंडलिक यांनी उमेदवारी घोषित केली नसल्याने मेळाव्याला उपस्थित नव्हतो, असा खुलासा केला.
समरजित घाटगे यांची भेट होत असते
उमेदवार घोषित झाल्यावर महायुतीच्या सगळ्या पक्षांचा मेळावा होईल असे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांची भेट घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की समरजित घाटगे यांची भेट होत असते, महाडिक यांच्याशी बोलणे सकारात्मक आहे. अनेकांची नावे चर्चेत आहेत, त्यामुळे माझ्यासोबत सरावाच्या कुस्त्या सुरू होत्या असं ते म्हणाले.
शाहू महाराजांवर बोलताना मंडलिक यांनी कोण मोठा, कोण छोटा म्हणून निवडणूक होत नसते. लोक मतदान करत असतात, आतापर्यंत केलेल्या कामाचा फायदा होईल असा दावाही त्यांनी केला. दरम्यान सतेश पाटील यांच्यावरही मंडलिक यांनी भाष्य केले. सतेज पाटील माझे चांगले मित्र असून ते पुन्हा माझ्या स्टेजवर येतील, मागीलवेळी ते आले होते. व्यक्तिगत हेवेदावेमधून लोकसभा निवडणूक होऊ नये असं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या