एक्स्प्लोर

Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापूर खड्ड्यात जाणाऱ्या दोन योजना आणल्या, लोकांनीच ठरवलंय त्यांचा कार्यक्रम करायचा; महाडिकांचा सतेज पाटलांवर हल्लाबोल

कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू असून या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यातील जुना वाद उफाळून आला आहे. 

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur News) खड्ड्यात जाईल अशा पद्धतीने दोन योजना माजी पालकमंत्र्यांनी (Satej Patil) आणल्या, त्यामुळे मी काय केलं जनतेला सांगतो, तुम्ही काय केलं ते जनतेला सांगा अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना (Dhananjay Mahadik on Satej Patil) आव्हान दिले. कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू असून या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यातील जुना वाद उफाळून आला आहे. 

मला या बालिश बुद्धीची कीव येते

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमधील प्रचाराची धार आणखी वाढत जाणार आहे. महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी पाईपलाईनचे उद्घाटन करून पाच महिने झाले. दिवाळीची आंघोळ जाऊन एकट्यानेच केली, पण कोल्हापूरकरांना पाणी मिळाले नाही, अशी टीका केली होती. या टीकेला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देताना  खासदार त्याच पाण्याने अंघोळ करत आहेत असे म्हटले होते. आता हाच धागा पकडत मला या बालिश बुद्धीची कीव येत असल्याचे म्हणत जोरदार टीका केली. 

एक महिन्यात आम्ही सिस्टीम पूर्ण करू असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याचे महाडिक म्हणाले. कोल्हापूर खड्ड्यात जाईल अशा दोन योजना माजी पालकमंत्र्यांनी आणल्याची टीकाही महाडिक यांनी केली. 

लोकांनी ठरवलंय त्यांचा कार्यक्रम करायचा 

कोल्हापूर लोकसभेसाठी सतेज पाटील यांनी जनतेनंच ठरवलंय अशी टॅगलाईन जाहीर केली आहे. या टॅगलाईनवरूनही धनंजय महाडिक यांनी पाटील यांच्यावर तोफ डागली. आता त्यांची टॅगलाईन कामाला येणार नाही, लोकांनी ठरवलं असून त्यांचा कार्यक्रम करायचा असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला. 

कोल्हापूर लोकसभेसाठी गेल्या काही दिवसांपासून महायुती उमेदवार बदलाची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय महाडिक यांनी उमेदवारी बदला संदर्भातील आमच्यापर्यंत कोणताही संदेश नसल्याचे स्पष्ट केले. खासदार संजय मंडलिक शिंदे गटाचे खासदार असले तरी त्यांच्या उमेदवारीला सर्वेचा दाखला देऊन भाजपकडून विरोध होत असल्याने अन्य पर्यायांची चाचपणी सुरू आहे. 

यामध्ये समरजितसिंह घाटगे आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, अजूनही याबाबत स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे संजय मंडलिक यांना तिकीट मिळेल की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती गाडी कोणाची?
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
सुषमा अंधारे म्हणाल्या, वाल्मिक अण्णा शरण आला, पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला, अंजली दमानिया म्हणतात...
Walmik Karad Surrender : काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
काल फडणवीस-धनंजय मुंडेंची भेट, आज वाल्मिक कराड शरण, भास्कर जाधवांच्या नव्या दाव्याने भुवया उंचावल्या!
Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
वाल्मिक कराडांनी शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Embed widget