एक्स्प्लोर

Kolhapur News: छपरी, टपरी, गावगन्ना गणंगांचा फ्लेक्सवर ढीगभर पसारा; जागा दिसेल तिथं फेका कचरा अन् तुंबत चाललेली वाहतूक कोल्हापूरची वाढती डोकेदुखी

Kolhapur News: कोल्हापूर शहराच्या नागरी समस्या गेल्या काही दिवसांपासून अधिक गंभीर स्वरूप प्राप्त करू लागल्या आहेत. या सर्वांमुळे कोल्हापूर शहराची ओळख पुरती हरवून गेली आहे.

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर शहराने अवघा एक वर्षांमध्येच दोन दंगली पाहिल्या. त्यामुळे कोल्हापूरच्या सामाजिक आणि पुरोगामी परंपरेला गालबोट लागलं. इतकेच नव्हे तर ज्या कोल्हापूरतून समतेचा संदेश, पुरोगामी संदेश दिला जातो तो राज्यात पोहोचला जातो आणि त्यानंतर तो देशात पोहोचतो असे नेहमी म्हटले जाते. त्याच शहराने दोन दंगली पाहिल्याने समाजमन सुन्न झालं. मात्र या घटनांना कोल्हापूरकरांनी वेळीच पायबंद घातल्याने परिस्थिती शांत होती. मात्र, दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा काही टवाळखोरांमुळे कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लागलं. कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये दोन मंडळांला खुमखुमीला दंगलीचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्याचा पर्यवसन तुंबळ दगडफेक करण्यामध्ये झालं. त्यामुळे सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावरच भर रस्त्यात तासभर नंगानाच झाला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी समन्वय साधताना दोन्ही बाजूकडील सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलवून घेत सामाजिक सलोखा जपण्यासाठी आवाहनं केलं. याला दोन्ही गटांनी प्रतिसाद देत सलोख्यानं राहण्याचा निर्धार केला. 

डीजे आणि फलकबाजीच्या वादानेच तुंबळ दगडफेक

पोलिसांनी नंगानाच करणाऱ्या 400 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यामधील 31 जणांची ओळख सुद्धा पटली आहे. सिद्धार्थनगरमधील डीजे आणि फलकबाजीच्या वादानेच तुंबळ दगडफेक झाली. या दोन गोष्टींमुळेच या वादानं गंभीर वळण घेतलं. मात्र, या घटना कोल्हापूरमध्ये का घडत आहेत? याकडे सुद्धा वेळीच पाहण्याची गरज आहे. कोल्हापूर शहराच्या नागरी समस्या गेल्या काही दिवसांपासून अधिक गंभीर स्वरूप प्राप्त करू लागल्या आहेत. कोल्हापूर शहरामधील उघड्यावरचा कचरा असेल, रस्त्यांची झालेली चाळण असेल, किंवा जे नव्याने रस्ते करण्यात आले आहेत त्यावरच सुद्धा वाहून गेलेलं डांबर असेल किंवा शहराचं फलकांच्या माध्यमातून झालेलं विद्रूपीकरण असेल या सर्वांमुळे कोल्हापूर शहराची ओळख पुरती हरवून गेली आहे. याला पायबंद बसण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

फलकबाजीने शहराचा पार कचरा होऊन गेला

कोल्हापुरातील चौकाचौकात नव्हे, तर आता गल्लीगल्लीमधील फलकबाजीने शहराचा पार कचरा होऊन गेला आहे. या फलकांवर कोणी राजकीय नेते सोडाच, पण सडकछाप गणंग, टपरी, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, मटका, जुगार चालवणारे सुद्धा फलकांवर झळकू लागले आहेत. फलक लावण्यासाठी महापालिकेकडून परवानगी आवश्यक असली, तरी गलोगल्ली ज्या पद्धतीने फ्लेक्स उभा राहत आहेत ते पाहता सर्वच फलकांना परवानगी घेतली जाते की नाही हा सुद्धा संशोधनाचा प्रश्न आहे. शिवाजी चौकामध्येही वादाला तोंड फुटेल अशा पद्धतीने फलक लावण्याचा उद्योगही सातत्याने होत आहे. इतकेच नव्हे तर आगामी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा पोलिसांनी कडक बंदोबस्त करण्याची गरज आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावरती असल्याने मंडळांना यंदा मोकळं रान आहे. त्यामुळे सिद्धार्थनगरची घटना गणेश विसर्जन मिरवणुकीतील उतारा म्हणून पाहण्याची गरज आहे. 

लेसर लाईटला बंदी, डीजेवर कारवाई हवीच 

गेल्यावर्षी कोल्हापुरात लेसर लाईटने अनेकांचे डोळ्यातून रक्त आले. डीजेनं कान बाद होण्याची वेळ आली. जिल्हाधिकाऱ्यांनी लेसर लाईटच्या वापराला बंदी घातली आहे. त्यामुळे डीजे दणदणाटावरही पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मर्यादा ठेवण्याची गरज आहे. निवडणुकीच्या तोंडावर मंडळांना इच्छुकांकडून झालेली मदत ही डीजेमध्येच दिसून येणार आहे. त्यामुळे  त्याचा अतिरेक होऊन नव्याने सिद्धार्थनगरसारखा प्रकार होऊ नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोल्हापुरात नको त्या गोष्टीचे उदात्तीकरण सोशल मीडियामधून होत असून सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करणे, गुंडांकडून रिल्स करणे, लहान मुलांकडून गुंडगिरीची रिल व्हायरल करणे अशा गोष्टी वारंवार घडत आहेत. त्यामुळे या गोष्टींना वेळीच पायबंध घालण्याची गरज आहे. 

कचरा समस्या गंभीर होत चालली 

कचऱ्यामुळेही शहराची समस्या गंभीर झाली आहे. कोल्हापूर शहरातील कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने शहरवासियांसह पर्यटकांना सुद्धा कचऱ्यामधूनच वाट काढत जावं लागत आहे अशी स्थिती आहे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच कार्यरत झालं आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यातील हजारो पक्षकार वकील आता शहरात येत आहेत. त्याचाही वाहतूक व्यवस्थेती आई अंबाबाईच्या माध्यमातून हजारो पर्यटक कोल्हापूरमध्ये भेटीगाठी करत आहेत. मात्र या मध्ये पर्यटकांना कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारांवर तुंबलेले कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे ते शहरांतर्गत कचरा समस्या सुद्धा गंभीर झाली आहे. वेळ वेळेवरती कचरा उठा होत नसल्याने कचऱ्याचे ढीच्या ढिक सातत्याने साथ मध्ये दिसून येत आहे त्यामुळे हे काय हा कचरा विल्हेवाट सुद्धा महात्मा गंभीर प्रश्न झाला आहे या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने एकत्र येतं यावरती कारवाई करण्याची गरज आहे

कोल्हापूरच्या फ्लेक्सबाजीवर सरन्यायाधीशांची खोचक टिप्पणी 

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण मागील रविवारी झाले. या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी कोल्हापूर विमानतळ ते शाहु समाधीस्थळ असा प्रवास करताना कोल्हापूर शहरातील फ्लेक्स नजरेतून सुटले नाहीत. गवई यांनी सर्किट बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमांमध्ये बोलतानाही त्याचा उल्लेख केला. सरन्यायाधीशांनी चौकाचौकातील फ्लेक्स पाहून आपल्या भाषणामध्ये सुद्धा उपरोधितपणे उल्लेख केला होता. गवई म्हणाले की, कोल्हापुरात येताना मी पाहिलं सगळ्यांनी होर्डिंग्ज लावले होते. त्यामधील एक दोन होर्डिंग्जवर माझा देखील फोटो छापला होता. चंद्रपूरमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजला मान्यता दिली होती. त्यावेळी श्रेयवादाचे होर्डिंग्ज लावले होते. त्यावर लोकसत्ता पेपरमध्ये मोठा लेख लिहिला होता हे सगळं श्रेय उच्च न्यायालयाचे असल्याचे सांगितले होते. वास्तविक कोल्हापूर सर्किट बेंचचा लढा सुद्धा सहा जिल्ह्यातील लोकलढा होता. यामध्ये सर्वाचं श्रेय असताना राजकीय फलकबाजी दिसून आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यामुळे ही फलकबाजी किती डोकेदुखी होत आहे याचा सुद्धा आता विचार करण्याची गरज आहे. 

वाहतूक अधिकच तुंबू लागली

कोल्हापुरात वाहतूक समस्या गंभीर रुप धारण करत असतानाच सर्किट बेंच सुरुवात झाल्यानंतर कोल्हापुरात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. यावर पोलिस अधीक्षकांनी बैठक घेत तोडगा काढण्याचा प्रय़त्न केला असला, तरी उपनगर समजल्या भागातही वाहतूक कोंडी होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget