Satej Patil on Jayshree Jadhav : त्यांना खासगी विमानाने मुंबईला नेलं, त्यांच्यावर कोणता दबाव होता? जयश्री जाधव सांगतील; पण कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही: सतेज पाटील
Satej Patil on Jayshree Jadhav : विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Satej Patil on Jayshree Jadhav, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. दरम्यान, जयश्री जाधव यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही
सतेज पाटील म्हणाले, जशी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली तशीच फोडाफोडी कोल्हापुरात झाली. कोल्हापुरातील काँग्रेसच्या माजी आमदार जयश्री जाधव यांना पक्षात घेतलं. जे या पक्ष प्रवेशासाठी घेऊन गेलेत त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश करून घेतला. खासगी विमानाने त्यांना कोल्हापुरातून मुंबईला घेऊन गेले. त्यांच्यावर दबाव होता की आणखी काय होतं हे जयश्री जाधव सांगतील. मात्र कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.
जयश्रीताई यांनी घेतलेला निर्णय क्लेशदायी आहे
पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, उमेदवारीबाबत त्यांच्याशी बोललो होतो, त्या नाराज नव्हती. मात्र कोणता दबाव त्यांच्यावर होता हे त्याचं सांगतील. जयश्रीताई यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. चंद्रकांत जाधव यांना निवडून आणण्यासाठी देखील जीवाचे रान केलं. किमान त्यांनी जाताना किंवा काही अडचण असेल तर माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. जे कृत्य जयश्रीताई यांनी केलं ते जाधव कुटुंबाला शोभणारं नाही. जयश्रीताई यांनी घेतलेला निर्णय क्लेशदायी आहे. पण कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार आहे.
आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत
जयश्री जाधव यांनी उमेदवारी मागितली होती त्यांची इच्छा होती. पण मी वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं होतं. आम्ही फोडफोडी करणार नाही पण आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत. क्षीरसागर यांना स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्याचा विश्वास नव्हता. त्यामुळं त्यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरू केले. अशा पद्धतीने फोडाफोडी करून कुणी कोंडीत पकडू शकत नाही. कोल्हापूरची जनता हे सहन करत नाहीत. जयश्री जाधव यांच्या प्रवेशाने आमचा विजय आणखी सुकर झाला आहे. महायुतीमधील खदखद बाहेर पडत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला