एक्स्प्लोर

आता परिवर्तन होणार, मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंना विश्वास, 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार

आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil : आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. येत्या 3 तारखेला भूमिका जाहीर करणार आहे. 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यातील एकच राहील, बाकीच्यांनी फॉर्म काढायचे आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले. आज मनोज जरांगे पाटील यांनी सज्जाद नोमांनी, आनंदराज आंबेडकर यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. 

मराठ्यांनी इथून पुढे आझाद म्हणून जगाव असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मायक्रो ओबीसींना , शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. आता परिवर्तन होणार आहे. आम्हाला देवेंद्र त्यात्यांनी लै शिकवलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. आम्ही लोकशाही मार्गाने चाललोय. कधी जात म्हणून मी बघणार नाही असेही ते म्हणाले. सध्या शेती मालाला दर नाही, दुधाला दर नाही असेही जरांगे म्हणाले.

मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले 

आम्ही धोक्यात आहोत तर मग हे हिंदू का म्हणत नाहीत की गरीब मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.  एकमेकांच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही. मी कट्टर हिंदू आहे. आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहोत असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 


आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत

आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. कोणीही दादागिरी करणार नाही असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जे नाव सांगेल त्यांनीच उमेदवारी ठेवायची, बाकीच्यांनी अर्ज काढून घ्यायचे असेही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्दाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपला समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला असल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, दलितांना काय दिलं आहे असा सवालही मनोज जरांगे यांनी केला. गेल्या 75 वर्षीत वीज पाणी यावरच बोलत आहेत असे जरांगे म्हणाले. अन्याय होऊ न देण्यासाठी ही लढाई आहे. आमची सहनशक्ती संपली आहे. तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार असे जरांगे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange: विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा खास फॉर्म्युला, मराठा- मुस्लिम- दलित तिहेरी मोट बांधणार?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 07 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्सShweta Mahale : भाजपच्या श्वेता महाले यांच्यासोबत दिवाळी आणि राजकीय फराळManoj Jarange  : सत्तापरिवर्तनसाठी आम्ही एकत्र, मुस्लिम समाजासोबत बैठकीनंतर जरांगेंनी बांधली मूठABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 06 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं
आधी रेल्वे सुटली, पुन्हा हल्लेखोर समजून कार्यकर्त्यानी मारलं, पोलिस तपासातून वेगळंच सत्य समोर आलं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
Embed widget