(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut on Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंनी 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी; संजय राऊतांचा बोचरा वार
धैर्यशील मानेंनी (Dhairyasheel Mane) 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी, असा बोचरा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इचरकरंजीमध्ये बोलताना केला.
Sanjay Raut on Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंनी (Dhairyasheel Mane) 'मीच खासदार' टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' करावी, असा बोचरा वार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इचरकरंजीमध्ये बोलताना केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झालेल्या बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्यावर राऊत यांनी चांगलीच तोफ डागली. राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, "यांचे नाव धैर्यशील कोण ठेवले? यांना कोठेच धैर्य नसतो. कदाचित त्यांना भाजपही तिकीट देणार नाही. खोकेपटूंमधील हाही मोठा खेळाडू आहे असे खात्रीलायकरित्या समजले आहे. जनभावना बघता त्यांना बाहेरही फिरता येणार नाही, अशा गद्दारांना तुम्हीच योग्य तो धडा शिकवा." इचलकरंजीमधील घोरपडे नाट्यगृहात शिवगर्जना मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचाही चांगलाच समाचार घेतला.
जनताच त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल
ते पुढे म्हणाले की, मूळ शिवसेना ही जनमाणसांची आहे. बाहेर गेलेले 40 गद्दार महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. त्यांच्या पुढील पिढ्यांनाही गद्दार म्हणून कायम कपाळावर कलंक राहणार आहे. जनताच त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल. धैर्यशील माने यांनी 'मीच खासदार' ही टॅगलाईन बदलून आता 'मीच गद्दार' अशी ठेवावी लागेल, आता तुम्हीच त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. शिवसेना संपवण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले, पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा बिल्लाला काय जमेल? त्यांनी शंभरवेळा पुनर्जन्म घेतला तरी ते शक्य नाही. शिवसेना ही एक ठिणगी आहे, बाळासाहेबांना अपेक्षित शिवसेना टिकून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे लढा द्यावा. 2024 च्या निवडणुकीनंतर यांना जनभावना कळेल मुख्यमंत्री व पंतप्रधान कोण असेल हेही कळेल." यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर आदींची भाषणे झाली.
राऊतांचा सरुडमधूनही हल्लाबोल
तत्पूर्वी, शाहुवाडी तालुक्यातील (Shahuwadi, Kolhapur) सरुडमध्येही त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, "मुंबई मनपाचे निवडणुकीचे नाव काढलं, तरी यांना घाम फुटतो. देवेंद्र फडणवीस आपलं मुख्यमंत्रीपद औटघटकेचं आहे. मी मुख्यमंत्र्यांविषयी बोलतच नाही, कारण त्यांना मुख्यमंत्री कोणी मानत नाही. दाढी वाढली म्हणजे मनगटात ताकद असते का? धनुष्यबाण हातात घेण्याची ताकद आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या