एक्स्प्लोर

Sharad Pawar on Pune By-election : आताच कसं सुचलं? काही कळत नाही; शरद पवारांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवरून दिले स्पष्ट संकेत!

Sharad Pawar on Pune By-election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

Sharad Pawar on Pune By-election :  पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून (Pune By-election) महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भाजपने आवाहन केले असले, तरी अजून कुठल्याही प्रकारचे एकमत झालेलं नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी या संदर्भात कोल्हापूर उत्तर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची उदाहरण देताना पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

चंद्रकांत पाटील पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते, या संदर्भात त्यांना विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, ते कोणाला पत्र लिहिणार आहेत, या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. ते बोलताना म्हणाले की, कोल्हापूरमध्ये देखील पोटनिवडणूक झाली होती ना? पंढरपूरला देखील झाली होती. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे यांना आत्ताच कसं सुचलं कळत नाही. त्यामुळे एकंदरीत पाहता कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा लढवण्याचे महाविकास आघाडीकडून स्पष्ट संकेत दिले जात आहेत. 

दुसरीकडे भाजपकडून अजूनही उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. भाजपकडून जवळपास दहा नावे केंद्रीय निवडणूक समितीला देण्यात आली आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या समन्वयावर भाष्य केले. ते म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्ष म्हणून एकत्र आहोत. आमच्यामध्ये समन्वय असून काळजी करण्याचे काही कारण नाही.  दरम्यान त्यांनी शिंदे गटाला यावेळी टोला लगावला. ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी फोडण्याची पावले ही शिंदे गटाकडून जास्त दिसत आहेत, पण असं घडत असतं. त्याची जास्त काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी पाच जणांच्या यादीत टिळक कुटुंबातील शैलैश टिळक आणि कुणाल टिळक यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच हेमंत रासने, गणेश बीडकर, धीरज घाटे या नावांचाही प्रस्ताव दिला आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. राहुल कलाटे देखील या पोटनिवडणुकीची तयारी करत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget