एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात एनआयएची पुन्हा छापेमारी; दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशय

NA raids again in Kolhapur : कोल्हापूर, नाशिकसह देशात पाच राज्यात 14 ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाईमुळे कोल्हापुरातील संशयितांचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत.

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) एनआयएकडून शनिवारी (12 ऑगस्ट) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पथकांनी जप्त केल्या. कोल्हापूर आणि नाशिकसह देशात पाच राज्यातील 14 ठिकाणी छापे टाकल्याचे एनआयएने रविवारी सांगितले. या कारवाईमुळे कोल्हापुरातील संशयितांचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे समोर येत आहेत.

अत्यंत गोपनीयरित्या कारवाई 

एनआयएच्या रेकॉर्डवरील दोन दहशतवादी पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर दहशतवाद्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील वावर तपासातून समोर येत आहे. एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील १४ ठिकाणे छापे टाकले. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक येथे टाकलेल्या छाप्यांमधून काही महत्त्वाची माहिती पथकांच्या लागली आहे. यात संशयास्पद कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे यासह मोबाइल, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तीन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. यातील दोघे 30 ते 35  वयोगटातील आहेत, तर एक अंदाजे 45 वर्ष वयाचा आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली. 

स्थानिक पोलिसांना माहिती नाही 

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना दिली नाही. कारवाई करून पथके परतल्यानंतरच याची माहिती एनआयएने जाहीर केली. याबाबत कोल्हापूर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'एनआयए, एटीएस किंवा आयबी अशा राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असतात. ते अधिकारी गरज असेल तरच स्थानिक पोलिसांची मदत घेतात. एनआयएने जाहीर केलेल्या प्रेसनोटशिवाय शनिवारी जिल्ह्यात झालेल्या कारवायांबद्दल अद्याप कोणतीच माहिती मिळालेली नाही.'

इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा अजेंडा

संशयितांकडे मिळालेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती एनआयएच्या हाती लागली. या कागदपत्रांनुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय ही दहशतवादी संघटना 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा अजेंडा घेऊन काम करीत आहे. दहशतवाद, हिंसाचार कृत्यांच्या माध्यमातून देशात 2047 पर्यंत इस्लामिक खिलाफत आणण्याचा ‘पीएफआय’चा उद्देश आहे. यासाठी युवकांची दिशाभूल करून त्यांना शस्त्रप्रशिक्षण दिले जात आहे. ‘पीएफआय’चे हे प्रयत्न रोखण्यासाठी ‘एनआयए’ कार्यरत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देवदर्शनाला जाणाऱ्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; बेळगावमध्ये भीषण अपघात, कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम

व्हिडीओ

Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaina NC: सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता यांची शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
सोनिया गांधींचा फोटो फाडताना तावातावात बाळासाहेबांचाच फोटो फाडला; आता शायना एनसी यांची सारवासारव, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, एकदा नाही तर 10 वेळा...
Shaina NC Balasaheb Thackeray Photo: ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले...
शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, निवडणुकीनंतर बाहेर चालत आले अन् म्हणाले...
Uday Samant on BJP: मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
मी पायाने बांधलेली गाठ हाताने सुटणार नाही; मंत्री उदय सामंतांचा भाजपच्या दादागिरीवरुन टोला
Beed Crime News: पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
पहाटेच्या सुमारस पत्नीला डोक्यात दगड घालून संपवलं; शेतात गेला, वाळलेल्या कपाशीला आग लावली अन् त्यात उडी घेतली, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Embed widget