Prithviraj Chavan on PM Modi : जादू चालत नसल्याने मोदी आता अवलंबून राहू नका, असं सांगत आहेत; पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला
Prithviraj Chavan on PM Modi : काँग्रेस सोडून सर्व पक्षांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. काँग्रेस नेत्यांना आमिष दाखवणात आली. मात्र, कोणीही विचार सोडला नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कोल्हापूर : पीएम मोदी यांची जादू आता चालत नसल्याने आता माझ्यावर अवलंबून राहू नका असं सांगत आहेत, लोक आता मोदींना प्रश्न विचारत आहेत. मोदींचा फोटो घेऊन गेला, तर लोक प्रश्न विचारणार असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कोल्हापूर (Kolhapur News) लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये संपन्न झाली. या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांकडून विविध विषयावर मते जाणून घेत मार्गदर्शन केले.
आता निवडणुका ग्राह्य धरून चालणार नाही. सोयीप्रमाणे निवडणुका घेतल्या जातात. देशात निवडणुका जिंकण्याकरिता धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे. मत मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण केले जात आहेत. काँग्रेस सोडून सर्व पक्षांनी भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. काँग्रेस नेत्यांना आमिष दाखवणात आली. मात्र, कोणीही विचार सोडला नाही. या हुकूमशाही प्रवृत्तीला लढा फक्त काँग्रेसच देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, फुटीचा परिणाम काय होईल यासाठी आढावा बैठक सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललं आहे हे निश्चितपणे काही कोणाला माहिती नाही. ते पुढे म्हणाले की, राजकीय तुलनात्मक अभ्यास केला. माझा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे पाठवणार आहे. पुढील रणनीती कशी अखायची आणि जागावाटप कसे करायचे यासाठी मदत होईल. कोल्हापुरातील दोन्ही जागा काँग्रेस पक्षाने लढवाव्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही
चव्हाण म्हणाले की, विधानसभा निवडणुका होणार नाहीत. 2024 ची निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशाच्या राजकारणाची दिशा हुकूमशाहीकडे चालली आहे. रशिया, चीनमध्ये जे झालं आता तिसऱ्या टर्ममध्ये पुन्हा मोदी आल्यास त्याच दिशेने देश जाईल. देशात संविधान अस्तित्वात राहणार नाही.
दरम्यान, कोल्हापुरत झालेल्या बैठकीसाठी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन.पाटील, आमदार जयश्री जाधव,आमदार जयंत आसगावकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या