एक्स्प्लोर

मुख्यमंत्री येणाऱ्या रोडवर फुटभर वर आलेली चॅनेल, गुडघाभर खड्ड्यांचे पॅचवर्क अन् स्पीडब्रेकरवर पट्टेही मारले; मग बाकी कोल्हापूरकर हाडामासाची माणसं नाहीत? 

हाॅकी स्टेडियम चौकापासून ते निर्मिती काॅर्नरपर्यंत या मार्गावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर पडलेले दोन दोन फुटाचे खड्डे, भररस्त्यात वर आलेले चॅनेलने अपघात नित्याचे आहेत.

Kolhapur Road: कोल्हापूर शहरातंर्गत रस्ते विकास प्रकल्पातून केलेल्या 49 किमी रस्त्यांचा आणि अन्य योजनेतून केलेल्या सुमारे दीडशे किमी रस्त्यांचा किमान अपवाद वगळता कोल्हापूर शहरात रस्ते कसे असावेत यापेक्षा ते कसे नसावेत असे एकापेक्षा एक नमुनेदार रस्ते कोल्हापूर शहरात आहेत. या सर्व रस्त्यांमध्ये गुडघाभर खड्डे, फुट दोन फुट वर आलेली ड्रेनेजची चॅनेल यामुळे प्रवास करायचा की नाही? असा प्रश्न रस्त्यातील ड्रेनेज पाहून पडतो. ही भयंकर परिस्थिती एका बाजूला असताना शहरामध्ये गॅस पाईपलाईन, ड्रेनेज लाईनसाठी, पाणीपुरवठा करणाऱ्या लाईनचे लिकेज काढण्यासाठी रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापुरात रस्त्यावरून गाडी मारताना नेमकी गाडी मारतोय कुरवड्या घालत जातोय याचाच अंदाज लागत नाही. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूरमध्ये मंगळवारी 13 जून रोजी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली. दोनवेळा कार्यक्रम पुढे ढकलल्याने प्रशासनाला पुरेसा वेळही मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांची एक लाख 58 हजारांवर गेल्याने प्रशासनाचे कौतुक करण्यात आले. 

मुख्यमंत्री येताच हाॅकी स्डेडियम रस्त्याचे रुपडे पालटले

मुख्यमंत्र्याचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांचा ताफा शिवाजी विद्यापीठ चौक-सायबर चौक- राजेंद्रनगर चौक- आयसोलेशन हाॅस्पिटल- हाॅकी स्टेडियम चौकातून डावे वळण घेत निर्मिती काॅर्नर चौक आणि तेथून कार्यक्रम असलेल्या तपोवन मैदानात पोहोचला. मुख्यमंत्री येणार असल्याने हाॅकी स्डेटियम ते निर्मिती काॅर्नर या मार्गावर ( शिवाजी विद्यापीठ चौकापासून हाॅकी स्टेडियमपर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे) ज्या तत्परतेने डागडुजी करण्यात आली ते पाहता इतर सर्वसामान्य कोल्हापूरकर हाडामासाचा माणूस नाही का? त्याला या मार्गावरून जाताना वेदना होत नाही का? असा प्रश्न डागडूजी करताना जाणवला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

हाॅकी स्टेडियम चौकापासून ते निर्मिती काॅर्नरपर्यंत या मार्गावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावर पडलेले दोन दोन फुटाचे खड्डे, भररस्त्यात वर आलेले चॅनेल आणि स्पीडब्रेकरवर नसलेल्या पट्ट्यांमुळे या मार्गावर अपघात नित्याचे आहेत. या मार्गावर खड्ड्यांचे तातडीने पॅचवर्क करण्यात यावे यासाठी सुद्दा सातत्याने मागणी करण्यात आली. मात्र, निधीचे कारण देऊन त्या रस्त्यावर कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात आली नव्हती. 

मात्र, शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री त्याच मार्गावर येणार असल्याने हाॅकी स्टेडियम चौक ते पार निर्मिती कॉर्नरपर्यंत या मार्गातील जितके स्पीड बेकर आहेत त्या स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे मारण्यात आले. हॉकी स्टेडियम चौकात जो महाकाय खड्डा पडला होता तोही बुजविण्यात आला. दोन दोन फूट वर आलेल्या दोन चॅनेलला सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर करून घेण्यात आले. त्याचबरोबर अनेक छोटे-मोठे खड्डे होते ते मुजवण्यात आले. निर्मिती काॅर्नर चौकांमध्येही मोठे खड्डे पडले होते ते सुद्धा पॅचवर्क करून मुजवण्यात आले. तीच तत्परता सर्वसामान्य नागरिक किंवा कोल्हापुरातील अन्य सामाजिक संघटनांकडून हे काम करण्यासाठी जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी मात्र प्रशासनाकडून त्यांना नकारघंटा दाखवली जाते.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दररोज कोल्हापुरात यावे आणि प्रत्येकवेळी वेगळा मार्ग पकडावा, जेणेकरून ते रस्ते तातडीने चांगले केले जातील आणि कोल्हापूरकरांची पाठदुखी, कंबरदुखी दूर होऊन वाहनांचा मेंटेनन्सही कमी होईल, असाच सूर आता सर्वसामान्यांमधून उमटू लागला आहे. 

सर्वपक्षीय समितीने खडसावले 

दुसरीकडे, कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पॅचवर्कसाठी कंपनीकडून मनपाला 20 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. लाईन टाकण्याचे काम पूर्ण होताच त्या ठिकाणी पॅचवर्क करणे आवश्यक होते. मात्र ते अजूही करण्यात आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर काल (14 जून) मनपा बैठकीत सर्वपक्षीय समितीने खडे बोल सुनावत तातडीने पॅचवर्क करण्याची मागणी केली. आता पॅचवर्क जरी केलं तर ते पावसाळा सुरु झाल्यानंतर राहणार का? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. कोल्हापूर शहरांतर्गत 1031 किमी रस्ते आहेत. मात्र, रस्ते विकास प्रकल्पातून जे 49 किलोमीटरचे रस्ते करण्यात आले तसेच अन्य योजनांमधून सुमारे दीडशे किमीचे रस्ते सोडल्यास अन्य रस्त्यांचा दर्जा अत्यंत भीषण आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Kolhapur News: गॅस पाईपलाईन खुदाईसाठी मिळालेल्या निधीतून कोल्हापुरात तातडीने पॅचवर्क करा; सर्वपक्षीय समितीकडून मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget