Kolhapur News: गॅस पाईपलाईन खुदाईसाठी मिळालेल्या निधीतून कोल्हापुरात तातडीने पॅचवर्क करा; सर्वपक्षीय समितीकडून मागणी
डांबरी प्लांट सुरू करून तयार होणारी डांबरी खडीच 100 कोटींच्या रस्तेकामासाठी वापरली जावी, अशी अट त्या निविदेत घालावी. जेणेकरून महापालिकेचा त्रास वाचेल व रस्तेही चांगले होतील, अशी मागणी समितीने केली.
Kolhapur News: कोल्हापुरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खुदाई करण्यात आलं आहे. त्यामुळे गॅस पाईपलाईनच्या खुदाईसाठी मिळालेल्या 20 कोटींतून रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने करा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीने केली आहे. ज्या अधिकाऱ्यामुळे विलंब झाला, त्याला कारणे दाखवा नोटीस काढा अशी मागणीही करण्यात आली आहे.रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी ड्रेनेजलाईनला जोडण्याची कार्यवाहीही त्वरित व्हावी, असे सांगितले. दरम्यान, कोल्हापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी गॅसपाईपलाईनचे तसेच रंकाळ्याचे काम सोमवारपासून सुरू होईल. एक कोटी 20 लाखांत डांबरी प्लांट उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा काढली जाणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली.
महापालिकेला रंकाळ्यातील प्रदूषण थांबवण्याची इच्छा दिसत नाही. 20 कोटी खर्चून ड्रेनेजलाईन टाकली आहे. त्याला जर कॉलनीतून येणारे सांडपाणी जोडले, तर रंकाळ्यात मिसळणार नाही. जुन्या कामाची फाईल सापडत नाही. गॅस पाईपसाठी खोदाई केलेल्या रस्त्यांचे पावसाळ्याआधी खडीकरण करावे. मुख्यमंत्र्यांसाठी रस्ते केले जातात, पण सामान्यांचा विचार केला जात नाही. रस्त्यांसाठी आलेले १०० कोटी रस्त्यांवर खर्च होतील, असे लेखी द्या.
डांबरी प्लांट सुरू करून त्यात तयार होणारी डांबरी खडीच 100 कोटींच्या रस्तेकामासाठी वापरली जावी, अशी अट त्या निविदेत घालावी. जेणेकरून महापालिकेचा त्रास वाचेल व रस्तेही चांगले होतील. माऊली चौकातील पार्किंग होत नसेल, तर स्टॅंडवर पार्किंग केले जाईल, असे सांगितले होते; पण अजून त्याचेही पुढे काही झालेले नाही. कोंबडी बाजारातील प्रकल्प सुरू केलेला नसून तेथील व्यावसायिकांना बेकायदेशीरपणे हटवले आहे. आयआरबीने केलेल्या रस्त्यांची दर पाच वर्षांनी बांधणी करायची आहे, पण आजतागायत झालेली नाही, अशी तक्रारींची सर्वपक्षीय समितीने केली.
इतर महत्वाच्या बातम्या