Kolhapur News : पतीचे निधन, अनुकंपावर नोकरी लागली, ऑर्डर घेऊन परत घरी येत असतानाच काळाचा घाला
Kolhapur : मृत जयश्री यांच्या पती पाटबंधारे विभागामध्ये नोकरीस होते. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी संघर्ष करून अनुकंपाखाली नोकरी मिळवली होती आणि त्या नोकरीच्या ऑर्डर आणण्यासाठी गेल्या होत्या.
कोल्हापूर : नियतीचा खेळ किती क्रूर असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नोकरी मिळाली आणि ऑर्डर घेऊन घरी येत असतानाच अपघात होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर केदारगावजवळ ही घटना घडली. टेम्पो व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील जयश्री दीपक नाईक (वय 47, रा. शिरोली, ता. हातकणंगले) असे त्यांचं नाव आहे. जयश्री या टेम्पोखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. दुचाकीस्वार नेताजी शिवाजी कांबळे (रा. पट्टणकोडोली ता. हातकणंगले) या अपघातात जखमी झाले आहेत.
ऑर्डर घेऊन परत घरी येत असतानाच काळाचा घाला
मृत जयश्री यांच्या पती पाटबंधारे विभागामध्ये नोकरीस होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी संघर्ष करून अनुकंपाखाली नोकरी मिळवली होती आणि त्या नोकरीच्या ऑर्डर आणण्यासाठी गेल्या होत्या. ती ऑर्डर ऊन येत असतानाच अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार केदारगावमधून कोल्हापूरकडे जाणाऱ्या टेम्पोने (बीडी-01-एफ-9258) दुचाकी (एमएच-09- डीयू 5619) धडक दिली. धडक दिल्याने जयश्री रस्त्यावर कोसळल्यानंतर त्यांच्या अंगावरून टेम्पो गेला. त्यामुळे त्या जागीच ठार झाल्या, तर दुचाकीस्वार नेताजी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एकाच कुटुंबातील तिघांचा करुण अंत
दुसरीकडे, तीन दिवसांपूर्वी कोल्हापुरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बसचा कोल्हापूर शहराजवळ राधानगरी मार्गावर पुईखडीजवळ उलटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत झाला. यामध्ये नीलू गौतम (वय 43), रिद्धिमा गौतम (वय 17) आणि सार्थक गौतम (वय 13) अशी मृतांची नावे आहेत. यामध्ये चौघेजण जखमी झाले. बसखाली अडकल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स गोव्याहून मुंबईला दिशेने जात होती. ही स्लीपर कोच बस गोव्यामधील पणजीमधून मार्गस्थ झाली होती. आज पहाटे दोनच्या सुमारास हीच बस कोल्हापूर शहरानजीक पुईखडीला भरधाव वेगात असताना पलटी झाली.
इतर महत्वाच्या बातम्या