एक्स्प्लोर

Kolhapur News: प्रतिपंढरपूर नंदवाळच्या विठुरायाचे पालकमंत्री दीपक केसरकरांनी घेतले दर्शन

Kolhapur news: कोल्हापूरपासून 14 किमी अंतरावर असलेल्या राधानगरी रोडवर वाशी गावाजवळ असलेल्या नंदवाळला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान आहे.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्राचीन मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज (29 जून) आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नंदवाळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे  दर्शन घेतले. शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ देत, चांगला पाऊस पडू दे, असे साकडे त्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी घातले.

कोल्हापूरपासून 14 किमी अंतरावर असलेल्या राधानगरी रोडवर वाशी गावाजवळ असलेल्या नंदवाळला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. विठ्ठल मंदिर हे विठ्ठलाचे निजस्थान असून दररोज मुक्कामासाठी, वास्तव्यासाठी विठ्ठल, राई (सत्यभामा), रखुमाई नंदवाळेमध्येच असतात असं समजलं जातं. या तीनही स्वयंभू मूर्ती एकत्र असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंथी मंदिर अनेक दशकांपूर्वीचे आहे. केसरकर यांनी नंदवाळला जाणाऱ्या पालखी, वारकरी, ग्रामस्थांची भेटी घेतल्या. विठूरायाचे नामस्मरण करत पंचक्रोशीतील भजनी मंडळे, वारकरी, दिंड्या यांच्या स्वागतासाठी सेवा देणाऱ्या अनेक सेवेकऱ्यांनी सेवा म्हणून प्रसादाचे वाटप स्टॉल्सलाही भेटी  दिल्या. पुईखडी येथे ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्यांप्रमाणेच गोल रिंगण सोहळा पार पडला.

यावेळी माजी आमदार चंद्रकांत नरके, करवीर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, नंदवाळ सरपंच अमर कुंभार, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, प्रतिपंढरपूर नंदवाळ श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष विश्वास पाटील, व्यवस्थापक भीमराव पाटील, पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

पंढरपूरच्या विकासाठी मोठा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला 

दरम्यान, केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, पहिल्यांदाच शासकीय महापूजा सुरू असताना भाविकांना दर्शन घेता आले. पंढरपूरच्या विकासाठी मोठा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ईद आणि एकादशीचा अनोखा योग आज आहे. 

जाहिरात नाट्यावरूनही भाष्य 

केसरकर यांनी  भाजप  शिंदे गटात झालेल्या जाहिरात नाट्यावरूनही भाष्य केले. त्या जाहिरातीमध्ये उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना वगळून कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत बोलताना केसरकर म्हणाले की,  मुळात ती जाहिरात मुख्यमंत्री यांना दाखवून केलेली नव्हती. कार्यकर्त्यांकडून ही जाहिरात दिली होती. ती थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तोपर्यंत प्रिंटिंगला जाहिरात गेली होती. त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नसल्याने नंतर जाहिरात दुसरी दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget