Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाहुण्यांच्या घरी नेत अत्याचार; नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी
Kolhapur Crime : 15 मार्च 2018 रोजी महाविद्यालयात निघालेल्या पीडित मुलीचे आरोपी सचिनने अपहरण केले होते. यानंतर नराधम आरोपीने पाहुण्यांच्या घरी नेत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
![Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाहुण्यांच्या घरी नेत अत्याचार; नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी kolhapur crime a minor girl kidnapped and taken to a guest house and tortured culprit ten years of hard labour punishment Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाहुण्यांच्या घरी नेत अत्याचार; नराधमास दहा वर्ष सक्तमजुरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/e445c0d671c3b0499b633eb40d715f731696487290935736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : पाच वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाहुण्यांच्या घरी अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मार्च 2018 मध्ये कोल्हापुरातील (Kolhapur Crime) करवीर तालुक्यात हा गुन्हा घडला होता. सचिन परशुराम पवते (वय 27, रा. परिते, ता. करवीर) असे त्या नराधमाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी त्याला झालेल्या सुनावणीत दोषी ठरवले. दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
पाहुण्यांच्या घरी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार
पीडित अल्पवयीन मुलगी अकरावीच्या वर्गात शिकत होती. 15 मार्च 2018 रोजी महाविद्यालयात निघालेल्या पीडित मुलीचे आरोपी सचिनने अपहरण केले होते. यानंतर नराधम आरोपीने पाहुण्यांच्या घरी नेत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर पीडित मुलगी घरी न आल्याने ती बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांकडून शोध सुरु असतानाच 3 एप्रिल 2018 रोजी पीडिता स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर झाली. आईने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी सचिनवर गुन्हा दाखल आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी न्यायालयात नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादी आणि पीडित मुलीची साक्ष, तसेच सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी शिक्षा ठोठावली.
अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात कॉलेजमधील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने दोन आरोपींना न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोषी ठरवले होते. दोन्ही आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. नोव्हेंबर 2018 मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचे अपहरण करून इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. हर्षल आनंदा देसाई (वय 24, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय 24, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत.
या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन असून, त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे. पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. 2 नोव्हेंबर 2018 रोजी आरोपींनी या मुलींना महावीर गार्डन येथे बोलवून घेत जबरदस्तीने त्यांना इस्लामपूरमधील भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)