एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Indian Gava in Kolhapur : कोल्हापुरात पुन्हा एकदा गवा आला, पळा पळा! ऊसाच्या फडातील गव्याच्या कळपाने यंत्रणेला घाम

कोल्हापूर शहरातील रमणमळा परिसरात ऊसाच्या फडात लपलेल्या गव्यांच्या कळपाने (Indian Gava) वनविभागाची झोप उडवली आहे. मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून पहारा देण्यात येत आहे.

Indian Gava in Kolhapur : कोल्हापूर शहरातील रमणमळा परिसरात ऊसाच्या फडात गव्यांच्या कळपाने (Indian Gava) वनविभागाची झोप उडवली आहे. मानवी वस्तीत गवे येऊ नयेत, यासाठी वनविभागाकडून डोळ्यात तेल घालून पहारा देण्यात येत असला, तरी गवे शेतातून मुक्काम सोडत नसल्याने यंत्रणेची झोप उडाली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा मानवी वस्तीतील वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  

दरम्यान, मंगळवारी, गव्यांच्या कळपाने शंभर फुटी रोडवर ऊसाच्या फडाच्या शेतीत तळ ठोकलेला दिसून आला. एका शेतात सकाळच्या सुमारास गव्यांचा कळप गेल्याचे स्थानिकांनी पाहिल्यानंतर वनविभागाचे गस्त पथक तैनात करण्यात आले. खबरदारीचा भाग म्हणून अग्निशामक दल व पोलिसांचे पथकास पाचारण करण्यात आले. 

गवे किती आणि कोठे थांबले आहेत, हे बघण्यासाठी ड्रोनने पाहणी करण्यात आली. यामध्ये गवे ((Indian Gava) असल्याची खात्री झाली.  मात्र, त्यांच्याकडून सायंकाळपर्यंत कोणतीही हालचाल झालेली नव्हती. वनपथकाने सायंकाळच्या सुमारास लाईट पाडून अंदाज घेण्याचा प्रयत्न केला; पण पुन्हा गवे फडात गायब झाले. आठच्या सुमारास मिरचीची धुरी करण्यात आल्यानंतर गव्यांच्या कळपाने फडात किंचित हालचाल केली, मात्र फडातून गवे बाहेर पडले नाहीत.

15 दिवसांत दुसऱ्यांदा गव्यांचा कळप

दोन आठवड्यांपूर्वी सहा गव्यांचा कळप पंचगंगा नदी काठच्या भागात आला होता. या कळपाने रमणमळ्यातील कडणे मळ्यात मुक्काम ठोकला होता.  त्यानंतर तो कळप गायब झाला होता. त्यानंतर 15 दिवसांच्या आत गव्यांचा दुसरा कळप कोल्हापूर शहराच्या दिशेने आला आहे. त्यापूर्वी, हातकणंगले तालुक्यातील टोप संभापूर येथील गंधर्व या ठिकाणी गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे गवा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. टोप संभापूरमधील चिन्मय गणाधीश गंधर्वमध्ये गवा दिसून आला होता. 

सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात एका तरुणाचा कोल्हापुरात मृत्यू झाला होता. ऑक्टोबर महिन्यात आजरा तालुक्यात एका महिला गव्याच्या तावडीतून थोडक्यात बचावली होती. तालुक्यातील भावेवाडीत ही घटना घडली होती. गवा शिरल्याने गावकरी ग्रामस्थ हुसकावून लावत असतानाच गव्याने मुख्य रस्त्याच्या दिशेने पळ काढला होता. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या महिलेचं ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर ती महिला जीवाच्या आकांताने बाजूला पळत सुटल्याने थोडक्यात जीव वाचला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : टायमिंग जुळलं नाही; शरद पवारांचेही आशीर्वाद घेतले असते - अजित पवारRohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुलीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget